Sat, Mar 23, 2019 16:49होमपेज › Pune › युवावर्गाचा शास्त्रीय नृत्याकडे ओढा

युवावर्गाचा शास्त्रीय नृत्याकडे ओढा

Published On: Apr 29 2018 2:41AM | Last Updated: Apr 29 2018 1:59AMपिंपरी ः पूनम पाटील

पिंपरी चिंचवड शहराची सध्या स्मार्ट सिटीकडे वेगाने वाटचाल सुरु आहे. परंतू असे असले तरी आधुनिकीकरणाबरोबरच शहरवासीयांमध्ये शास्त्रीय नृत्याची आवड दिवसेंदिवस वाढत असून आज अनेक पालक आपल्या मुलांना  आनंदाने शास्त्रीय नृत्य प्रशिक्षण देत आहेत. काळाबरोबर अनेक नवीन नृत्यप्रकार अस्तित्वात आले. परंतू प्राचीन भारतीय परंपरेच्या जोरावर स्पर्धेच्या काळात शास्त्रीय नृत्य आपले अस्तित्व टिकवून आहे. याशिवाय अऩेक चित्रपटांमधये शास्त्रीय नृत्य येउ लागल्याने तरुणांसह नवीन पिढीला या नृत्याची आवड निर्माण झाली आहे.त्यामुळे शास्त्रीय नृत्याचे महत्व पून्हा वाढले आहे. शहरातही शास्त्रीय नृत्यकलेविषयी दिवसेंदिवस पालक व युवावर्ग आकर्षित होत असून शास्त्रीय नृत्य प्रशिक्षणाकडे युवावर्गाचा कल दिवसेंदिवस वाढत असल्याचे मत शहरातील ज्येष्
 नृत्यप्रशिक्षकांनी व्यक्त केले आहे. 

29 एप्रिल हा दिवस जागतिक नृत्य दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. आधुनिक बॅलेचा जनक, जीन जॉर्जेस नोरेन याचा हा जन्मदिन. नृत्य हा भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. त्यामुळे पुर्वीच्या तुलनेत शास्त्रीय नृत्याचे महत्व वाढले असून हा दिवस आज मोठ्या प्रमाणावर साजरा होत असल्याचे चित्र आहे. 

शहरातील सांस्कृतिक तसेच नृत्य प्रशिक्षण संस्था वेगवेगळया स्तरांवर नृत्यांचे कार्यक्रम सादर करुन आजही शास्त्रीय नृत्यपरंपरा जपण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या मुलामुलीने शास्त्रीय नृत्य शिकावे असे वाटणार्‍या पालकांची संख्या वाढते आहे. महाराष्ट्राची स्वत:ची शास्त्रीय नृत्यशैली नाही. तरीदेखील शहरात शास्त्रीय नृत्य शिकण्यासाठी भरपुर प्रतिसाद आहे. त्यांना मिळणारा प्रतिसादही उत्तम आहे. परंतू जागतिक स्तरावर हि कला सादर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासन कायमच उदासीन असून इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात एकही नृत्यमहोत्सव साजरा करणत आलेला नाही. त्यामुळे काही कलाकार पदरमोड करुन कार्यक्रमाचे आयोजन करतात. परंतू अशा कार्यक्रमांना पुरस्कर्ते मिळत नाही. त्यामुळे राज्य शासनाने नृत्यकलाकारांची दखल घ्यावी ़व महोत्सव आयोजित करुन त्यांना प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी शहरातील नृत्यकलाकारांनी केली आहे.