Sat, Apr 20, 2019 15:51होमपेज › Pune › सरकारी जागांवर व्हावीत अत्याधुनिक टपालकचेर्‍या

सरकारी जागांवर व्हावीत अत्याधुनिक टपालकचेर्‍या

Published On: Jan 21 2018 2:52AM | Last Updated: Jan 20 2018 11:23PMपुणे : प्रतिनिधी 

काळाच्या ओघात टपाल कार्यालयामध्ये बदल होणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाच्या असलेल्या जागांवर सर्वसुविधांनियुक्त अत्याधुनिक कार्यालये उभारण्यासाठी टपाल कार्यालयाने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न आणि औषध प्रसाधान मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त कली.

टपाल कार्यालयाच्या पुणे विभागाच्यावतीने महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातील टपाल तिकीट संग्राहाच्या तिकीटांचे  ‘महापेक्स 2018’ या तीन दिवशीय प्रदर्शनाचे उदघाटन बापट यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी  टपाल विभागाच्या संचालिका सुमिता अयोध्या, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कलेकशन ऑफ तिकीट आयटम चे अध्यक्ष नरेंद्र टोले, टपाल कार्यालयाच्या पुणे विभागाचे जनरल पोस्ट मास्तर गणेश सावळेश्‍वरकर उपस्थित होते. यावेळी राज्यातील तसेच भारतातील सुमारे 98 तिकीट संग्राहकांच्या 400 फ्रेम्र या प्रदर्शानात मांडण्यात आल्या आहेत. याबरोबरच केव्हेन साईट या खनिज तिकीटाचे प्रकाशन या वेळी केले.

बापट म्हणाले,“ ग्रामीण भागात बँका ज्या प्रमाणे कार्यरत आहेत अगदी तशाचे काम टपाल कार्यालयांचे झाले पाहिजे. 

गणेश सावळेश्‍वरकर म्हणाले, या प्रदर्शनात ड्रोनच्या सहकार्याने टपाल पाठविण्याचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले तसेच सेवेज यंत्राच्या सहाय्याने  टपाल एका कार्यालयातून दुस-या कार्यालयात पाठविण्याचे सोय करण्यात येणार आहे .असा प्रयोग जगात पहिल्यांदाच होणार असल्याचे त्यांनी सांगितले.