Wed, Apr 24, 2019 20:20होमपेज › Pune › विहिंप व मातंग समाजाकडून एम्पायर इस्टेट पुलाचे नामकरण

विहिंप व मातंग समाजाकडून एम्पायर इस्टेट पुलाचे नामकरण

Published On: May 06 2018 1:47PM | Last Updated: May 06 2018 1:47PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने एम्पायर इस्टेट पुलाला संत मदर तेरेसा यांचे नाव देण्याआधीच शहरातील मातंग समाज व  बजरंग दलाच्या वतीने रविवारी एम्पायर ईस्टेट पुलाला आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे असे नाव देण्यात आले. पुलाच्या दोन्ही बाजूस फलक लावण्यात आला ,नारळ फोडून ,गुलाल उधळून नामकरण करण्यात आले 

पिंपरी चिंचवड महापालिकेने जे एन एन यु आर एम अंतर्गत काळेवाडी फाटा ते देहू आळंदी या बीआरटी प्रकल्पांतर्गत 1600 मीटर लांबीचा चिंचवड -एम्पायर इस्टेट उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला. पुलाला २०१० मध्ये मान्यता मिळाली. निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर ६ एप्रिल २०११ ला काम सुरू झाले. गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेले काम आठ वर्षांनी पूर्ण झाले आहे. 

पुलाचे उदघाटन करून त्याला संत मदर तेरेसा यांचे नाव देण्यासाठी पालिकेची धावपळ सुरू आहे. मात्र त्याआधीच शहरातील मातंग समाज व  बजरंग दलाच्या वतीने रविवारी एम्पायर ईस्टेट पुलाला आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे असे नाव देण्यात आले. यावेळी बजरंग दलाचे कुणाल साठे ,कुणाल साठे ,मातंग समाजाचे कार्यकर्ते भाऊसाहेब अडगळे ,संदिपान झोंबाडे,युवराज दाखले आदी उपस्थित होते