Tue, Mar 26, 2019 08:19होमपेज › Pune › रस्ते, पाणी, विद्युत यासह नागरी समस्यांचा अभाव

रस्ते, पाणी, विद्युत यासह नागरी समस्यांचा अभाव

Published On: Jun 18 2018 1:11AM | Last Updated: Jun 17 2018 11:10PMविश्रांतवाडी : वार्ताहर 

लोहगावचा अकरा गावाबरोबर महापालिकेत समावेश झाला आहे. मात्र नागरी समस्या सोडविण्यासाठी महापालिका लक्ष देत नाही. ग्रामपंचायत असताना समस्या सुटत होत्या मात्र आता समस्या सुटत नाहीत. रस्ते- सांडपाणी- विदुत यासह नागरी समस्या मोठया प्रमाणात भेडसावत आहेत. मुख्य चौकात ड्रेनज ओव्हर फ्लो होऊन रस्त्यावरून वाहत आहे. सुट्ट्या असल्यामुळे महापालिका लक्ष देत नाही. पोरवाल रस्त्याकडून निंबाळकर वस्ती व लोहगाव गावकुसाकडे जाणार्‍या रस्त्याच्या दुर्दशा झाली आहे. 

नुकत्याच महापालिकेत सामील करण्यात आलेल्या लोहगावमधील या भागात गुडविल 24 या सोसायटीपासून जवळजवळ 2 किलोमीटरचा रस्ता खराब आहे. लोहगाव गावकुस रोड, गोलेगाव, पिंपळगाव, मरकळ, निरगुडी, वडगाव शिंदे आदी गावांतून येणारे लोक या रस्त्याचा वापर करतात. गेली दोन वर्षे हा रस्ता खराब आहे. याचे डांबरीकरण झालेले नाही. रस्त्यावर अनेक खड्डे आहेत. त्यामुळे चालताना वा दुचाकीवरून नागरिक घसरल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. रस्ता छोटा असल्यामुळे एकावेळी एकच गाडी जाऊ शकते. त्यामुळे इतर गाड्यांना बाजूला थांबावे लागते. अनेकदा विशेषतः शाळेच्या वेळेत रस्त्यावर गर्दी असते.  चार महिन्यांपूर्वी आमदार जगदीश मुळीक यांच्या प्रयत्नाने ग्रामविकासनिधीतून सुमारे 10 लाख रुपये खर्चून या रस्त्यावर सांडपाणी वाहिनी बसवण्याचे काम करण्यात झालेले आहे. त्यावेळी चेंबर्स बसवले आहेत, पण त्यांवर झाकणे नाहीत. शिवाय चेंबरभोवतीही मोठमोठे खड्डे आहेत. त्यामुळे त्या चेंबरमध्ये वा खड्ड्यांमध्ये कुणी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यात कुणी पडला तर 10-12 फूट खाली जाईल. रात्रीच्या वेळी रस्त्यावर पथदिवे नसल्याने अंधारात या रस्त्यावरून वावरणे धोकादायक झालेले आहे. यामुळे अगदी तातडीने हा रस्ता करण्यात यावी, अशी शिवसेनेने मागणी करण्यासाठी केले. 

या आंदोलनात अमित जंगम, सोमनाथ खांदवे, काळूराम साठे, संजय मोझे, एकनाथ खांदवे, अनिल कदम, अभिजित नवले, अजिंक्य अहिरेकर, शिवनाथ खांदवे, वैभव जंगम, लोहगाव शाखाप्रमुख मनोज ढोकले यांसह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 8 दिवसांत रस्त्याचे काम झाले नाही तर शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी शिवसेनेतर्फे देण्यात आला. लोहगाव मुख्य चौकात ड्रेनेज लाईन ओव्हर फ्लो होऊन मैला पाणी रस्त्यावर वाहत आहे. मनपाचे कोणी याकडे लक्ष दिले नाही. पवार वस्ती. वाघोली रस्ता यासह अनेक ठिकाणचे पोलवरील लाइट बंद आहेत. तक्रार करून देखील मनपा चे कर्मचारी लक्ष देत नाहीत. गावात पाणी समस्या तीव्र आहे. यासह अनेक नागरी समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. त्यामुळे महापालिकेने तातडीने लोहगावकराना सोयीसुविधा द्याव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.