Wed, Jun 20, 2018 16:43



होमपेज › Pune › नक्षलवादी कनेक्‍शन : अटकेत असलेल्या चौघांच्या पोलिस कोठडीत २१ जूनपर्यंत वाढ

नक्षलवादी कनेक्‍शन : अटकेत असलेल्या चौघांच्या पोलिस कोठडीत २१ जूनपर्यंत वाढ

Published On: Jun 14 2018 5:39PM | Last Updated: Jun 14 2018 6:35PM



पुणे : प्रतिनिधी 

माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेल्या चौघांच्या पोलिस कोठडीत २१ जूनपर्यंत वाढ करण्याचा   आदेश विशेष न्यायाधीश के. डी . वडणे यांनी दिला आहे. 

सुधीर प्रल्हाद ढवळे (रा. सारनाथ टॉवर बुध्दनगर, गोवंडी, मुंबई), रोना विल्सन (रा. नवी दिल्ली), शोमा सेन (रा. नागपूर) आणि महेश सीताराम राऊत (३०, पिंपळरोड, नागपूर मुळ रा. लाखापूर जि. चंद्रपूर) अशी पोलिस कोठडीत वाढ  झालेल्या चौघांची नावे आहेत.