Tue, Mar 26, 2019 11:39होमपेज › Pune › कोल्हापूर पोलिसांनाही हवाय डीएसकेंचा ताबा

कोल्हापूर पोलिसांनाही हवाय डीएसकेंचा ताबा

Published On: Feb 23 2018 5:21PM | Last Updated: Feb 23 2018 5:21PMपुणे : पुढारी ऑनलाईन

फसवणुकीच्या गुन्‍ह्यात उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांना पत्‍नी हेमंती यांच्यासह अटक करण्यात आले आहे. कोल्हापुरात दाखल गुन्‍ह्यांसाठी पोलिसांनाही डीएसकेंचा ताबा हवा आहे. यासाठी पोलिसांनी पुणे न्यायालयात अर्ज केला आहे. 

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये जिल्ह्यांतील सुमारे पावणे तीनशे लोकांनी गुंतवणुक केली होती. याप्रकरणी २०१७ मध्ये कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यात आर्थिक गुन्हे शाखेकडे ४ हजार पेक्षा जास्त लोकांची सुमारे २८५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्‍हा त्यांच्यावर आहे. 

उच्च न्यायालयाने या फसवणुकीच्या प्रकरणात डीएसकेंचे अटकेपासून संरक्षण काढून घेतले. त्यानंतर डीएसके व त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना पुणे पोलिसांच्या पथकाने दिल्लीतून अटक केली. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी देखील डीएसके आणि त्यांच्या कुटुंबीयांचा ताबा घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

दरम्यान, उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांना पत्‍नी हेमंती यांच्यासह १ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ससून मेडिकल बोर्डाने आज दिलेल्या अहवालात त्यांची प्रकृती स्‍थिर असल्याचे म्‍हटले आहे.