सातबारा संगणकीकरणात  कोल्हापूर मागे

| पुढारी"> 
Sun, May 19, 2019 22:24होमपेज › Pune ›

सातबारा संगणकीकरणात  कोल्हापूर मागे

सातबारा संगणकीकरणात  कोल्हापूर मागे

Published On: Apr 05 2018 2:12AM | Last Updated: Apr 05 2018 12:59AMपुणे : समीर सय्यद

शेतकर्‍यांना अचूक संगणकीकृत 7/12 देण्यासाठी शासनाच्या भूमिअभिलेख विभागाने कार्यक्रम हाती घेतला आहे. राज्यात 43 हजार 948 महसुली गावांपैकी 37 हजार 778 गावांमध्ये सातबारा ऑनलाईन मिळत आहे. राज्यातील दहा जिल्ह्यांत आणि 210 तालुक्यांमध्ये सातबारा ऑनलाईनचे 100 टक्के काम पूर्ण झाले आहे. पुणे, सातारा जिल्ह्यात 50 टक्क्यांपेक्षा अधिक, तर कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात 20 टक्क्यांपेक्षा कमी काम आहे.

राज्यातील सातबारा उतारा 2002 पासून संगणकीकृत करण्यात आला होता. मात्र, त्यात मोठ्या प्रमाणात चुका आढळून येत होत्या. त्यामुळे शेतकर्‍यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. शेतकर्‍यांना अचूक संगणकीकृत 7/12 देण्यासाठी राज्यच्या भूमी अभिलेख शाखेकडून केंद्र पुरस्कृत डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत पुण्याच्या राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने ई-फेरफारची प्रणाली विकसित केली आहे. त्याआधारे राज्यात ई-फेरफार करून महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख नोंदवह्या तयार केल्या जात आहेत. राज्यातील संबंधित महसूल यंत्रणेला सातबाराचा सर्व्हे नंबर योग्य प्रकारे लिहिणे, अचूक संगणकीकृत सातबारा व आठ अ साठी 24 मुद्द्यांवर तपासणी केली जात आहे. महसूल विभागाकडून अतापर्यंत अनेकवेळा संपूर्ण राज्यात सातबारा ऑनलाईन मिळेल, अशी घोषणा केली होती. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे ही प्रक्रिया खोळंबत असल्याने मुदतवाढ द्यावी लागत आहे. 

अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, उस्मानाबाद, जालना, नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात 100 टक्के काम झाले आहे, तर 19 जिल्ह्यांमध्ये 90 टक्क्यांपेक्षा अधिक काम झालेे आहे. पुणे विभागातील, पुणे जिल्हा 55 टक्के, सातारा 50.26 टक्के  आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 19.97 टक्के सातबारा ऑनलाईन झाले आहेत. सर्वात कमी कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्हा 17.97 आणि रत्नागिरीमध्ये केवळ 11.76 टक्के काम पूर्ण झाले आहे.  38 हजार गावांत रिईडिटींगचे काम पूर्णराज्यामध्ये 43 हजार 948 महसुली गावे असून, त्यातील 41 हजार 403  गावांतील खाते प्रोसेसिंग झाले आहेत. तर 38 हजार 56 गावांमधील सातबारांचे रिईडिटींगचे काम झाले आहे. मात्र, एकूण गावांपैकी 2545 गावांमध्ये या प्रक्रियेचा पहिला टप्पा असलेल्या खाते प्रोसेसिंगच अद्याप पूर्ण झालेली नाही.

Tags : Pune, Kolhapur, Back, computerization, Satbara