Wed, Jul 17, 2019 10:08होमपेज › Pune › खंडाळा घाटात पुन्हा दरड कोसळली, कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेस थांबवली

खंडाळा घाटात पुन्हा दरड कोसळली, कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेस थांबवली

Published On: Aug 25 2018 11:38PM | Last Updated: Aug 25 2018 11:38PMपुणे: प्रतिनिधी 

पुणे-मुंबई लोहमार्गावरील खंडाळा घाटात शनिवारी रात्री पुन्हा दरड कोसळण्याची घटना घडली. शुक्रवारी दरड कोसळून २४ तास उलटत नाहीत तोच पुन्हा या घाटात दरड कोसळल्याने रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. 

शनिवारी रात्री ९.३० वाजल्यानंतर लोणावळ्याहून मुंबईला जणारी रेल्वे वाहतूक रात्री उशिरापर्यंत ठप्पच होती. दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले होते. यादरम्यान कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेस खंडाळा स्थानकात थांबविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.