Thu, Apr 25, 2019 07:55होमपेज › Pune › कीर्तन, प्रवचनांतून माणुसकी टिकविण्याचे महान कार्य

कीर्तन, प्रवचनांतून माणुसकी टिकविण्याचे महान कार्य

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 25 2017 11:37PM

बुकमार्क करा

वडगाव मावळ : 

संस्कार घडले नाही, तर समाजातील माणुसकी संपेल, ती टिकविण्याचे काम कीर्तन, प्रवचनांच्या माध्यमातून वारकरी सांप्रदाय करीत आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.

वडगाव मावळ येथे मावळ तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने आयोजित वारकरीभूषण पुरस्कार सोहळ्यामध्ये ते बोलत होते. या वेळी वै. किसन महाराज शेटे यांच्या स्मरणार्थ हभप शंकरमहाराज मराठे यांना जीवनगौरव, तर वै. काशिनाथ महाराज भोसले यांच्या स्मरणार्थ हभप सुदाम महाराज भोसले यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी, खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार कृष्णराव भेगडे, दिगंबर भेगडे, केशवराव वाडेकर, कार्यक्रमाचे निमंत्रक आमदार संजय भेगडे, सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, अविनाश बवरे, भास्करराव म्हाळसकर, प्रशांत ढोरे, सुनील शेळके, सोपानराव म्हाळसकर, माऊली शिंदे, ज्ञानेश्‍वर दळवी, एकनाथ टिळे, निवृत्ती शेटे, गुलाब वरघडे, चंद्रशेखर भोसले, बंडोपंत भेगडे आदी उपस्थित होते.

हभप संजय महाराज पाचपोर  कीर्तनसेवा सादर करताना म्हणाले, की साधना प्रामाणिक असेल, तर स्वतंत्र पूजेची गरज नाही. त्यामुळे श्रीमंताने साधनेची बरोबरी करण्याचा प्रयत्न कदापीही करू नये, असे मत व्यक्त केले. या वेळी, प्रकाश महाराज बोधले, संदीपान महाराज शिंदे, मच्छिंद्र महाराज कुंभार, आसाराम महाराज बढे, अनिल महाराज पाटील, संतोष महाराज सुंबे आदींचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक आ. भेगडे यांनी केले.  

विकास महाराज खांडभोर यांनी सूत्रसंचालन केले.  नंदकुमार भसे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन आ. भेगडे, सभापती म्हाळसकर, उपसभापती कदम यांच्यासह संतोष शेलार, रघुनाथ लोहर, भरत येवले, नाथा शेलार, महादूबुवा नवघणे, मकरंद ढमाले, सदाशिव पेटकर, अनंता कुडे, योगेश चोपडे, मनोहर ढमाले, भाऊ कालेकर आदींनी केले.