Fri, Jan 18, 2019 07:13होमपेज › Pune › अल्पवयीन मुलीचे अपहरण करून दोघांनी केला विनयभंग

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून दोघांनी केला विनयभंग

Published On: Jun 07 2018 2:08AM | Last Updated: Jun 07 2018 12:54AMपुणे : प्रतिनिधी

घरातून भेळ आणण्यासाठी गेलेल्या बारा वर्षांच्या चिमुकलीचे दोघांनी कारमध्ये अपहरण करीत तिचा विनयभंग करण्यात आला असून, शिवाय पीडित मुलीला एका खोलीत डांबून बाहेरून कडी लावत निघून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

येरवडा परिसरात हा प्रकार रविवारी रात्री घडला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण गावडे आणि त्याच्या एका साथीदार मित्र अशा दोघांवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण गावडे हा मुलीला ओळखतो. 

दरम्यान, रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी घरातून भेळ आणण्यासाठी म्हणून बाहेर पडली. मात्र, आरोपींनी तिला रस्त्यात अडविले. तिचा हात पकडून जबरदस्तीने कारमध्ये बसवत तिचे अपहरण केले.

त्यानंतर तिला एका खोलीत नेले. त्याठिकाणी तिचा विनयभंग करण्यात आला. त्यानंतर आरोपींनी खोलीत तिला डांबून ठेवले. तसेच, बाहेरून कडी लावून दोघेही पसार झाले.  दरम्यान, बराच वेळ झाल्यानंतर मुलगी न आल्याने पालकांनी शोध घेतला. त्यावेळी हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस तपास करत आहेत.