Fri, Apr 26, 2019 15:18होमपेज › Pune › अपहृत युवतीचा डोक्यात दगड घालून खून

अपहृत युवतीचा डोक्यात दगड घालून खून

Published On: Dec 05 2017 1:44AM | Last Updated: Dec 05 2017 1:23AM

बुकमार्क करा

चाकण : वार्ताहर

अपहृत युवतीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील धामणे येथे सोमवारी (दि. 4) उघडकीस आली आहे. या युवतीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत शेतात मिळून आल्याने युवतीच्या खुनापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले असावेत, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. कोमल कांताराम कोळेकर (वय 17 वर्षे 6 महिने, रा. धामणे, ता. खेड) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे.  संबंधित युवती शुक्रवारी (दि. 1) दुपारी साडेतीन वाजल्यापासून बेपत्ता होती. भामाबाई कांताराम कोळेकर (वय 42) यांनी मुलगी कोमल हिचे अपहरण झाल्याची तक्रार शनिवारी रात्री चाकण पोलिस ठाण्यात दिली होती.  

धामणे (ता. खेड) येथील स्वतःच्या शेतात भामाबाई काम करत असताना मुलगी कोमल ही दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आईबरोबर शेतात कामास आली. त्यानंतर सुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कोमल  वर्गातील मुलीला मोबाईल नंबर देण्यासाठी व पिण्यासाठी पाणी घेऊन येते, असे म्हणून शेतातून घरी निघून गेली. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कोमलची आई शेतातील काम आटोपून घरी आली. तेव्हा मुलगा प्रसाद (वय 19) हा घरी होता, परंतु मुलगी कोमल घरी नव्हती. त्यानंतर त्यांनी याबाबत शेजारी महिलांकडे विचारपूस केली.

शेजार्‍यांनी सांगितले की, कोमल हिला सायंकाळी सव्वाचार वाजेच्या सुमारास घरातून पुन्हा शेताकडे जात असताना काळूबाई मंदिर परिसरात पाहिले. त्यानंतर ती कोठे गेली हे पहिले नाही. त्यानंतर कोमलची आई भामाबाई, भाऊ प्रसाद यांनी शेजारी राहणार्‍या लोकांकडे, तसेच नातेवाईकांकडे विचारपूस करून तिचा शोध घेतला, परंतु कोमल कोठेच मिळून आली नाही. त्यानंतर तिच्या अपहरणाची तक्रार चाकण पोलिसांत देण्यात आली होती.  त्यानंतर सोमवारी सकाळी भाऊ प्रसाद याला कोमल हिचा चेहर्‍याचा भाग रक्ताने माखलेला व अर्धनग्न अवस्थेतील कुजू लागलेला मृतदेह स्वतःच्याच शेताच्या जवळ दिसून आला.