Thu, Nov 15, 2018 18:30होमपेज › Pune › पावसाळ्यातही ‘पीएमपीएमएल’ची बोंब

पावसाळ्यातही ‘पीएमपीएमएल’ची बोंब

Published On: Aug 31 2018 1:43AM | Last Updated: Aug 31 2018 1:43AMखेड शिवापूर : वार्ताहर

स्वारगेट ते कोंढणपूर, स्वारगेट ते खेड शिवापूर, स्वारगेट ते नसरापूर, स्वारगेट ते आर्वी, स्वारगेट ते राहटवडे या दरम्यानच्या ‘पीएमपीएमएल’च्या बसगाड्या दिवसातून किमान एकदा कात्रज जुन्या घाटात किंवा इतर ठिकाणी बंद पडतात. त्यामुळे विद्यार्थी व कामगारांना तासन्तास रस्त्यावर उभे राहून पुढील बसची वाट पाहवी लागत असल्याचे चित्र बुधवारी (दि. 29) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पुन्हा पाहावयास मिळाले. 

स्वारगेट ते खेड शिवापूर पुढील गावांसाठी असणार्‍या  बसगाड्यांना प्रवासी व विद्यार्थी पूर्णतः वैतागलेले आहेत. या प्रकरणावर किंबहुना यावर ठोस उपाययोजना काढण्यात ‘पीएमपीएमएल’ प्रशासन उदासीन दिसत आहे.