Wed, Jul 17, 2019 18:05होमपेज › Pune › 135 कोटी रुपये मंजूर, आता पर्यटनाला चालना मिळणार 

135 कोटी रुपये मंजूर, आता पर्यटनाला चालना मिळणार 

Published On: Mar 25 2018 1:52AM | Last Updated: Mar 25 2018 12:37AMखडकवासला : वार्ताहर 

पुण्याला तसेच सिंहगड ,पानशेत भागाला  तोरणा, राजगड , वेल्हा परिसर जवळच्या अंतराने जोडणारया रांजणे _पाबे घाट रस्त्यासह पुणे _ पानशेत , तसेच सिंहगडावर जाणारया  कोंढणपूर व डोणजे मार्गे सिंहगड घाट रस्त्यासाठी 135 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हा निधी   ऍन्युइटी पध्दतीने  मिळाला आहे. त्यासाठी ट्राय पार्टी ऍग्रिमेंट केले जाणार आहे.   याबाबत, सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याची ही कामे येत्या दोन वर्षात पूर्ण केली जाणार आहेत. त्यानंतर, काँक्रीट व डांबरी रस्त्याची पुढील दहा वर्षाची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी त्या ठेकेदाराची आहे.

यासाठी सरकारच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग, ठेकेदार व बँक यांच्यात एक करार केला जाणार आहे. त्यानुसार, दोन वर्षात काम पूर्ण झाल्यानंतर अपेक्षित खर्चाच्या 60 टक्के निधी ठेकेदाराला द्यायचा. पुढील 10 वर्षात उर्वरित 40टक्के निधी टप्पाटप्प्याने द्यायचा. त्या दरम्यान, रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी त्या ठेकेदारावर असणार आहे. या रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया पुण्यात पूर्ण झाली आहे.

कमी दराने आलेल्या निविदा मान्य केल्या आहेत. त्यानंतर, अंतिम मंजुरीसाठी मुख्य अभियंता यांनी याबाबतचा प्रस्ताव करून मुंबईला सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविला आहे. आता याबाबत वित्त व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात बैठका होऊन होईल. पुढील प्रक्रीया सुरू होणार आहे. पुणे पानशेत रस्त्याचे रूंदीकरण तसेच रहदारी असलेल्या ठिकाणी काँक्रीटकरण केले जाणार आहे. खानापुर मार्ग रांजणे पाबे घाट रस्त्याचे रूंदीकरण व डांबरीकरण तसेच काँक्रीटकरण केले जाणार आहे.