Tue, Jul 16, 2019 01:36होमपेज › Pune › 'त्या' अपघातात कुणाकुणाच्या आठवणी काढू

'त्या' अपघातात कुणाकुणाच्या आठवणी काढू

Published On: Jan 30 2018 2:16AM | Last Updated: Jan 30 2018 1:47PMपुणे : नेहा सराफ

पोटचा मुलगा, मुलगी, जावई, दोन सुना आणि तब्बल सात नातवंडे गमावल्यावर आता मी कुणाकुणाच्या आठवणी काढू, असे म्हणत अश्रूंना नकळत वाट करून देत हुंदका देणार्‍या मंदा केदारी या मातेला बघून सार्‍या बालेवाडीकरांचे हृदय हेलावल्याचे दृश्य सोमवारी बघायला मिळाले.  शुक्रवारी रात्री कोल्हापूरला झालेल्या अपघातात पुण्यातील केदारी कुटुंबातील नऊ जणांना आपला प्राण गमवावा लागला. त्या काळरात्रीतून केवळ तीन व्यक्ती बचावल्या असून, त्यातील दोघींना सोमवारीरुग्णालयातून घरी आणण्यात आले.

त्यापैकी मंदा केदारी यांचा मुलगा सचिन, सून भावना आणि नीलम, मुलगी छाया, जावई संतोष, नातवंडे गौरी, ज्ञानेश्वरी, साहिल, संस्कृती, आराध्य, प्रतीक, श्रावणी अशा  सात नातवंडांवर काळाने घाला घातला आहे. याच अपघातात त्या जखमी झाल्याने त्यांना परिस्थितीची कल्पना देण्यात आली नव्हती; मात्र सोमवारी त्यांना रुग्णालयातून घरी येण्यापूर्वी सत्य सांगण्यात आले आणि त्यांच्या डोळ्यासमोर अंधार पसरला तो कायमचाच!  बराच वेळ तर त्यांना काय बोलावे तेही सुचत नव्हते. त्यानंतर मात्र रडता-रडता या माऊलीचा बांध फुटला. ‘मला फक्त आता आठवणी गिरवायला मागे ठेवले आहे. आता मी कोणाकोणाच्या आठवणी काढू’ असे सांगताना त्यांच्या डोळ्यातील पाणी आटत नव्हते. ‘माझा साहिल कुठे गेला? माझी भावना, दीदी कुठे गेल्या, पोरं कुठे गेली’ असे विचारताना त्यांच्या आक्रोशाने सारे उपस्थित हेलावले. त्यांची जखमी नात प्राजक्ता हिलाही रुग्णालयातून सोडण्यात आले. आई, भाऊ यांच्यासह आजोळचे नातेवाईक डोळ्यासमोर गमावलेल्या प्राजक्ताला धक्का बसला आहे.  

प्राजक्तामुळे कुटुंबाशी तत्काळ संपर्क 

अपघातात जखमी झालेली नात प्राजक्ता हिने त्याही अवस्थेत पोलिसांना आजोबा भरत केदारी यांचा नंबर सांगितला आणि त्यांना 1 वाजून 5 मिनिटांनी पोलिसांचा फोन आला. त्यानंतर ते कोल्हापूरला गेल्याचे केदारी यांनी सांगितले. त्या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड मदत केल्याचेही त्यांनी कृतज्ञतेने नमूद केले.

झोपेत आरडाओरडा ऐकू आला... सारे संपले!

या घटनेबद्दल मंदा यांनी घरच्यांना सांगितले. रत्नागिरी येथे सार्‍या कुटुंबीयांनी एका स्नेह्यांकडे जेवण केले. त्या वेळी न जेवलेल्या सचिन याच्या जेवणासाठी पुन्हा एकदा हॉटेलमध्ये ते काही काळ थांबले. त्यानंतर कोल्हापूरला थांबून दुसर्‍या दिवशी अंबाबाई व ज्योतिबाचे दर्शन घेण्याचा त्यांचा बेत होता; मात्र बस कोल्हापूरजवळ आली तेव्हा त्यांना झोप लागली होती. अचानक बस खाली पडत असून, आरडओरडा ऐकू आला आणि सारेच संपल्याचे त्यांनी सांगितले. 

इतर बातम्या  

कंडोम वापरणार्‍या तरुणी, महिलांच्या संख्येत वाढ

आठ महिन्यांच्या चिमुरडीवर भावाकडून बलात्कार    

U 19 विश्वचषक : पाकचा ६९ धावात खुर्दा; भारत अंतिम फेरीत दाखल  

कोल्हापूर : चालकाच्या चुकीने अपघात?