Wed, Nov 21, 2018 03:07होमपेज › Pune › पत्रकार कल्पेश याज्ञिक यांच्या मृत्यूप्रकरणी महिला पत्रकार सलोनी अरोरावर गुन्‍हा 

पत्रकार कल्पेश याज्ञिक यांच्या मृत्यूप्रकरणी महिला पत्रकार सलोनी अरोरावर गुन्‍हा 

Published On: Jul 21 2018 8:11AM | Last Updated: Jul 21 2018 8:11AMपुणे  : देवेंद्र जैन 

ज्येष्ठ पत्रकार कल्पेश याज्ञिक यांना बलत्काराच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकावण्याची धमकी देउन पाच कोटी रुपये खंडणी मागीतल्याप्रकरणी इंदौर पोलिसांनी महिला पत्रकार सलोनी अरोरा हिच्या विरोधात पहाटे गुन्हा दाखल केला आहे. तिच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहे. 

याज्ञिक यांचा १२ जुलै रोजी दैनिकाच्या कार्यालयात संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्युने संपुर्ण देशात खळबळ उडाली होती. अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेंद्रसिंह चौहान यांनी दुरध्वनीवरुन पुढारी प्रतिनिधी बरोबर बोलताना सांगितले की, पुर्वी सलोनीला एका दैनिकामधून काही कारणास्तव कामावरुन काढून टाकण्यात आले होते. यानंतर ती याज्ञिक यांच्या संपर्कात होती. त्यानुसार पोलिस तपास करत होते. तपासा दरम्यान सलोनीबाबत अनेक गोष्टी समोर आल्या. तिने याज्ञीक यांना, ती याज्ञीक व आपल्यात काय संबंध होते ते ती जाहीर करेन, असे जर मी करु नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला मला पाच कोटी रुपये द्या व  परत कामावर घ्यावे लागेल, तसे न केल्यास ती त्यांच्या विरोधात बलात्काराची खोटी तक्रार दाखल करणार अशी धमकी देत होती. यानंतर पोलिसांनी सर्व तपास करून सलोनी विरोधात पोलिसात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. तिचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.