Sat, Mar 23, 2019 02:29होमपेज › Pune › प्राचिन धार्मीक स्थळे भारतीय संस्कृतीचे प्रतिक : ज्येष्ठ पुरातत्वशास्त्रज्ञ गो.बं. देगलुकर 

प्राचिन धार्मीक स्थळे भारतीय संस्कृतीचे प्रतिक : ज्येष्ठ पुरातत्वशास्त्रज्ञ गो.बं. देगलुकर 

Published On: Feb 13 2018 2:01AM | Last Updated: Feb 12 2018 11:21PMपुणे : प्रतिनिधी

भारतासारख्या देशाला उज्ज्वल आणि समृद्ध धार्मिक पंरपरेचा वारसा लाभलेला आहे हा वारसा प्रत्येक भारतीयाने अनुभवण्यासारखा असून ही प्राचिन धार्मिक स्थळे भारतीय संस्कृतीचे प्रतिके आहेत त्याचा आपण अभिमान बाळगणे आपले आद्य कर्तव्य असल्याचे मत डेक्कन अभिमत विद्यापीठाचे अध्यक्ष, ज्येष्ठ पुरातत्वशास्त्रज्ञ आणि मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो.बं. देगलुकर यांनी व्यक्त केले. 

स्वहिंदू चॅरीटेबल ट्रस्ट आणि चौधरी यात्रा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने कैलास पर्वत आणि मानससरोवर या विषयी माहिती देणार्‍या छायाचित्र प्रदर्शनाचे 12 ते 15 फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. टिळक स्मारक मंदिराच्या बेसमेंट हॉलमध्ये आयोजीत या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ.गो.बं. देगलुकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्वहिंदू ट्रस्टचे सुनील सोनवणे, चौधरी यात्रा कंपनीचे व्यवस्थापक प्रकाश चौधरी आणि संचालक ब्रिजमोहन चौधरी उपस्थित होते.

हे प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत सर्वांसाठी विनामुल्य खुले असणार आहे. कैलास पर्वत आणि मानसरोवर परिसरात अनेक धर्मीयांची श्रद्धा असलेली विविध ठिकाणे आहेत. चीऊगोम्पा, मानसरोवर, राक्षसताल, यमव्दार, अष्टपाद पर्वत, गणेश पर्वत, शिवस्थळी, गणेश कुंड, गौरीकुंड अशा विविध स्थळांची माहिती या  प्रदर्शनाच्या माध्यमातून करुन देण्यात येणार आहे.