Tue, Jun 18, 2019 20:19होमपेज › Pune › संयुक्त कायदा प्रवेश परीक्षेत ; पुण्याचा आदित्य देशात १७ वा

संयुक्त कायदा प्रवेश परीक्षेत ; पुण्याचा आदित्य देशात १७ वा

Published On: Jun 25 2018 1:51AM | Last Updated: Jun 25 2018 12:45AMपुणे : प्रतिनिधी 

देशातील महत्वपुर्ण संयुक्त कायदा प्रवेश परीक्षा (काँमन लाँ अँडमीशन टेस्ट उङ-ढ) च्या झालेल्या परिक्षेत पुण्याचा आदित्य प्रमोद फळणीकर हा 17 वा आला आहे. 

शहरातील बी ई जी च्या केंद्रीय विद्यालयातुन आदित्य 12 वी उत्तीर्ण झाला असुन, उङ-ढ च्या परिक्षेकरिता त्याचे शिक्षक मीराज थाँमस यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षणाबरोबर तो बँडमींटन टेनीस व अँथलँटीक्स च्या अनेक स्पर्धां मध्ये चमकला आहे.  

देशाच्या सुरक्षा व्यवस्थेतील महत्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (छडॠ) चे अतिरिक्त पोलीस महासंचालक असलेले प्रमोद फळणीकर यांचा आदित्य हा मुलगा आहे. पुढील शिक्षणासाठी आदित्य आता बंगळुरु येथील महाविद्यालयात प्रवेश घेणार असल्याचे प्रमोद फळणीकर यांनी पुढारी प्रतिनिधीला सांगीतले.