Wed, Mar 20, 2019 22:57होमपेज › Pune › व्यावसायिक के. जे. जाधव यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा

व्यावसायिक के. जे. जाधव यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा

Published On: Jun 09 2018 1:51AM | Last Updated: Jun 09 2018 1:51AMपुणे : देवेंद्र जैन

शहरातील प्रसिद्ध व्यावसाईक के. जे. जाधव यांच्यावर वारजे पोलीस ठाण्यात कोट्यवधी रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

बांधकाम व्यावसाईक रविंद्र सांकला यांनी या बाबत पुणे पोलीस आयुक्त कार्यालयातील ईओडब्ल्यु शाखेत तक्रार दिली होती. जाधव यांच्या सुरु असलेल्या के. जे. टाँवर्स येथील प्रकल्पामध्ये सांकला यांना काही गाळे देण्याचा करार करण्यात आला होता. त्यापोटी सांकला व त्यांचे भागीदार रमेश कावेडीया यांनी 4 कोटी रुपये जाधव यांना दिले होते. पण जाधव यांनी सांकला यांना लीहून दिलेले गाळे विजय तुकाराम रौंदळ व जयंतीलाल संघवी यांना विकल्याचे सांकला यांना कळले; त्यामुळे त्यांनी जाधव यांना दिलेले 4 कोटी परत मागीतले. जाधव यांनी 4 कोटी रुपयांपैकी 1 कोटी रुपये सांकला यांचे भागीदार कावेडीया यांना परत केले.  सांकला यांचे 3 कोटी रुपये मात्र परत केले नाहीत. त्यामुळे सांकला यांनी मोफा कायद्यानुसार फसवणुक व विश्वासघाताची तक्रार पोलीसांकडे दाखल केली होती. 

सदर तक्रारीच्या अनुशंगाने पोलीसांनी तपास सुरु केला व त्यात तथ्य आढळल्याने वारजे पोलीस ठाण्यात के. जे. जाधव यांच्या विरोधात, भारतीय दंड संहीतेच्या कलम 420,406 व मोफा कायद्याचे कलम 3,4, 13(1) व 13(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस जाधव यांचा शोध घेत आहेत व लवकरच त्यांना अटक केली जाईल असे पोलीसांच्या वतीने सांगण्यात आले.