Thu, Jul 18, 2019 16:28होमपेज › Pune › खानावळ बंद करणे कुणाच्या हिताचे?

खानावळ बंद करणे कुणाच्या हिताचे?

Published On: Apr 21 2018 1:19AM | Last Updated: Apr 21 2018 12:34AMपुणे : नरेंद्र साठे

राज्यातील आदिवासी वसतिगृहातील खाणावळी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याऐवजी विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. त्यामुळे पुणे शहरातील सात तसेच जिल्ह्यातील 22 आदिवासी वसतिगृहातील सुमारे 3 हजार 615 विद्यार्थ्यांना नव्याने खाणावळींचा शोध घेऊन शासनाकडून पैसे येण्याची वाट पहावी लागणार आहे. पूर्वीच्या खाणावळी बंद करून शासन कुणाचे हित साध्य करतेय, असा प्रश्‍न आदिवासी वसतिगृहात राहणारे विद्यार्थी करत आहेत.

काही वर्षापूर्वी स्टेशनरीसाठीचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जात. त्याचे पैसे कधी वेळेवर मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे आता खाणावळीच बंद करून त्याऐवजी थेट पैसेच विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा आदिवासी विकास विभागाकडून शासन निर्णय काढण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना खिशातील पैसे गुंतवावे लागणार आहेत. शासन निर्णयामध्ये म्हटले आहे की, विद्यार्थ्यांची प्रत्येकाची आवड-निवड वेगळी असते. त्यामुळे वसतिगृहातील ठेकेदार पद्धतीने सुरू असलेल्या खाणावळीत निवडीचे स्वातंत्र्य राहत नाही. विद्यार्थ्यांनी चांगली खाणावळ लावावी, असे सुचवण्यात आले आहे.

आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यातील अ, ब आणि क वर्गातील महापालिका, विभागीय शहरे, जिल्हास्तरीय शासकीय वसतिगृहातील अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना आर्थिक सहाय्य म्हणून थेट रक्कम विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. ही योजना सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात घोडेगाव येथील प्रकल्प कार्यालयाशी संपकर्र् साधला असता, त्यांनी या विषयावर बोलण्यास टाळले.

Tags : Pune, decided, close, dungeon,  Adivasi hostel, state