Sun, Jul 21, 2019 02:10होमपेज › Pune › उपोषणासारख्या गोष्टी मी परत करणार नाही : इरोम शर्मिला

उपोषणासारख्या गोष्टी मी परत करणार नाही : इरोम शर्मिला

Published On: May 11 2018 8:36PM | Last Updated: May 11 2018 8:36PMपुणे : प्रतिनिधी

मला लोकांसाठी असलेले सरकार आवडते. सरकारचे आतंकवादी कारवायांवर जास्त लक्ष आहे. सामान्य लोकांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे हे सरकार दुर्लक्ष करीत आहे. अण्णा हजारे हे एक चांगले विचारवंत आहेत. त्यांनी उपोषणाद्वारे सरकारचे लक्ष वेधले. मात्र, मी उपोषणासारख्या गोष्टी परत करणार नाही, असे मत मणिपूर राज्यातील सामाजिक, राजकीय कार्यकर्त्या, कवी 'आयर्न लेडी' इरोम चानू शर्मिला यांनी व्यक्त केले.

सरहद पुणेतर्फे इरोम चानू शर्मिला यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, वकील आणि मानवाधिकार कार्यकर्ते अमीत सरोदे उपस्थित होते. युवराज शहा यांनी इरोम शर्मिला यांच्याशी संवाद साधला. इरोम शर्मिला या जगातील सर्वात जास्त काळ उपोषण केलेल्या महिला आहेत. त्यांनी तब्बल १६ वर्षे शासन यंत्रणे विरुद्ध उपोषण केले.

 इरोम शर्मिला म्हणाल्या, न्याय मिळावा म्हणून मी स्ट्रगल केलं. १६ वर्षाच्या उपोषणानंतर मी गिव अप केले नाही. मी समाजासाठी एक ओळख बनले. २००९ मध्ये आतांकवाद्यांनी माझ्या खोलीत प्रवेश केला, मला धमकी दिली, माझ्यावर खूप दबाव टाकण्यात आला. उपोषणांतर राजकीय क्षेत्रात जाणे हा माझ्यासाठी एक चांगला अनुभव होता. मी सरहद संस्थेची ब्रँड आंबसिडोर म्हणून काश्मीर प्रश्नावर काम करणार आहे. ही एक उत्तम कल्पना आहे. सरकारशी लढण्यासाठी माझ्यासाठी हा एक गोल्डन चान्स आहे. माझ्या क्षमतेनुसार मला सरकार आणि समाज या दोघांमधील एक माध्यम म्हणून काम करायला आवडेल. मानवाचे रक्षण करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक करणे हे मानवतेचे लक्षण नाही.