Thu, Jul 18, 2019 14:25होमपेज › Pune › अनधिकृत गणेश मंडपांची तपासणी मोहीम

अनधिकृत गणेश मंडपांची तपासणी मोहीम

Published On: Sep 06 2018 1:49AM | Last Updated: Sep 06 2018 1:47AMपुणे : प्रतिनिधी

गणेशोत्सवासाठी अनधिकृत मंडप उभारणार्‍यांवर कारवाईसाठी येत्या शुक्रवारपासून जिल्हा प्रशासनाकडून तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी शहरात चार पथके तयार करण्यात आली असून, त्यात जिल्हा प्रशासन, पोलिस आणि महापालिका यांचे अधिकारी असणार आहेत.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्त्यांवर अनधिकृत मंडप उभारण्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार यासंबंधीची कारवाई जिल्हा प्रशासनामार्फत करायची आहे. या कारवाईसाठी बुधवारी हवेली तहसील कार्यालयात महापालिका, पोलिस यांची सयुक्‍तिक बैठक झाली. त्यात अनधिकृत मंडपांवर कारवाईसाठी एक मुख्य समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये मंडल अधिकारी, उपायुक्त दर्जाचे पोलिस व महापालिका अधिकारी यांचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त शहराच्या पातळीवर चार पथके तयार करण्यात आली असून तलाठी, वॉर्ड अधिकारी, पोलिस अधिकारी यांचा समावेश आहे. 

न्यायालयाच्या आदेशानुसार उत्सवाच्या सहा दिवसआधीच तपासणी करणे बंधनकारक आहे. त्यानुसार या पथकांमार्फत येत्या शुक्रवारपासून ही तपासणी करण्यात येणार असून, त्यात आढळून येणार्‍या अनधिकृत मंडपांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे या पालिकेच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.