Tue, Jun 25, 2019 21:38होमपेज › Pune › ‘पावर’बाज उत्तराची ‘राज’कीय कारकीर्द

‘पावर’बाज उत्तराची ‘राज’कीय कारकीर्द

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 22 2018 1:23AMपुणे ः प्रतिनिधी

तरुणांसह अबाल वृद्धांचा ओसंडून वाहणारा उत्साह, विविध विषयांना हात घालणारे कवी संमेलन, महाविद्यालयासह सामाजिक, राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील विविध घडामोडी, किस्से, हस्स्यांचे फवारे, शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट अशा उत्साही वातावरणात पुणेकर रसिकांनी अनुभवली ‘पावर’बाज उत्तराची ‘राज’कीय कारकीर्द. निमित्त होते, जागतिक मराठी अकादमी आणि बीव्हीजी ग्रुपतर्फे बुधवारी आयोजित केलेल्या ‘शोध मराठी मनाचा’ या बहुचर्चित ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुलाखतीचे. मुलाखतकार महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कधी ठाकरे शैलीत तर कधी विनोदबुद्दीने, मुस्सदीपणे प्रश्‍न करत  शरद पवार यांची राजकीय, सामाजिक कारकीर्द उलगडली. 

वाचा : आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे : शरद पवार

पवार म्हणाले,  राज्यातील तरूणांमध्ये निर्माण झालेल्या जातीय द्वेश दूर करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे.  हा द्वेश वाढविण्याचे काम राज्यकर्त्यांंमधील एक गट करत आहे. फुले-शाहू-आंबेडकारांनी समाज एकसंघ ठेवण्याचे काम केले. त्यामुळे सध्याच्या द्वेशाच्या वातावरणात फुले-शाहू-आंबेडकारांचे विचार समाज एकसंघ ठेवतील. दलित आणि आदिवासी यांच्या आरक्षणासंबंधी कोणाचेही दुमत नाही. मात्र आर्थिकदृष्ट्या दुबळ्या असणार्‍या कोणत्याही जातीतील लोकांना आरक्षण मिळणे गरजेचे आहे. खासगीकरणामुळे सरकारी नोकर्‍या राहिलेल्या नाहीत, हे वास्तव मान्य करून नव्या पिढीत व्यवसायिक दृष्टीकोण बिंबवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

मी नेहरुंना दूरुन पाहिले, यशवंतराव चव्हाण तरुण पिढीसमोर आदर्श व्यक्तीमत्त्व. ज्यांनी योगदान दिले त्यांचे आदर सोडू नका,असा  आम्हाला यशवंतराव चव्हाण यांनी कानमंत्र दिला. तो मी अद्याप सोडलेला नाही. अलीकडे व्यक्तीगत हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. हल्ले करताना आपण कोणत्या पदावर आहोत, हे पाहिले जात नाही. 12 व्या शतकात या देशात लोकशाही होती, नेहरुंनी देशाला योगदान दिले नाही, असे विधान संसदेत केले जाते. विरोधकांसह समोरच्या व्यक्तींचा आदर कसा ठेवावा, हे अटलबिहारी वाजपेयी यांनी दाखवून दिले आहे, मात्र आज ते चित्र पहायला मिळत नाही. 

वाचा : महाराष्ट्रासाठी दिल्ली हातात हवी : शरद पवार

महाराष्ट्रपेक्षा नेहरू महत्त्वाचे असे विधान यशवंतराव चव्हाण यांनी केल्यानंतर आम्ही यशवंतरावांना पक्षाच्या बैठकीक प्रश्न विचारला होता. तेव्हा‘मी राष्ट्राचा आधी नंतर राज्याचा विचार करतो’, असे उत्तर त्यांनी दिले होते. महाराष्ट्रातील अनेक नेतृत्त्वांनी नेहमीच राष्ट्राचा विचार केला आहे. याची छळ लागते. हे मान्य असले तरी जात,धर्म, व्यक्ती, भाषा, राज्य या महत्त्वाच्या आहेत मात्र त्या आधी राष्ट्राचा विचार महत्त्वाचा आहे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

देशात आलेल्या परदेशी पाहुण्यास मिटी मारणे आणि त्याला अहमदाबादला घेऊन जाणे, हे चित्र वारंवार पहायला मिळते. तुम्ही राज्याचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहेत, हे विसरून चालत नाही. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते मुख्यमंत्र्यांच्या सभेत मनमोहनसिंग यांच्यावर व्यक्तीगत हल्ला करत होते. त्यामुळे कॉग्रेसचे मंत्री गुजरातच्या प्रश्‍नांना महत्त्व देत नव्हते. मी गुजरातच्या प्रत्येक प्रश्नात लक्ष घालत होतो, त्यामुळे ते माझ्या घरी येत असतात. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी बोट धरून राजकारणात आल्याचे विधान केले. खरे तर मी माझी करंगळी त्यांचा हाताला लागू दिली नाही. राजकारण वेगळे आणि व्यक्तीगत सलोखा वेगळा असतो. व्यक्तीगत सलोखा कसा जपला जातो, हे बाळासाहेबांनी देशाला दाखवून दिले आहे, असेही पवार म्हणाले. 

मोदी खूप कष्ट करतात, कार्यालयाला जास्त वेळ देतात, ही त्यांची जमेची बाजू आहे. राज्य चालवणे आणि देश चालवणे यात फरक आहे. एकटा व्यक्ती अधिकार्‍यांना घेऊन राज्य चालवू शकतो. देश चालवायला विविध राज्यातील टीम लागते. आज मोदीची टीम म्हणून काम करण्याची भूमिका दिसत नाही. त्यामुळे हवे तसे काम होते का नाही, यात शंका आहे, असेही पवार म्हणाले. 
यावेळी माजी केंद्री गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते शरद पवार यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहोन आगाशे, अशोक सराफ, दिग्दर्शक नागराज मंजुळे, विश्‍वजीत कदम, यशवंतराव गडाख हनुमंतराव गायकवाड, ज्येष्ट वात्रटीकाकार रामदास फुटाणे, सचिन ईटकर आदी उपस्थित होते. राहुल सोलापूरकर यांनी निवेदन केले. 

जनतेस विदर्भ वेगळा व्हावा, असे वाटत नाही 

मराठवाड्यात अनेक वर्षे निजामाचे राज्य होते. त्यामुळे मराठवाड्यातील लोकांना मध्य महाराष्ट्राचे आकर्षण होते. विदर्भाचे वेगळे आहे. विदर्भ मध्य भारताचा हिंदी भाषिक भाग होता. विदर्भातील चार जिल्ह्यात वेगळ्या विदर्भाची मागणी केली जाते. वेगळा विदर्भ मागणारे मुलत: मराठी नाही, ते हिंदी भाषिक आहेत. सामान्य मराठी माणूस स्वतंत्र विदर्भासाठी तयार नाही. विदर्भ वेगळा व्हावा, असे विदर्भातीलच जनतेस वाटत नाही.

.. म्हणून मी पुन्हा राज्यात आलो

बाबरी पडल्यावर दंगली झालेल्या दंगलिमुळे मला पुन्हा राज्यात पाठविण्यात आले. दिल्लीत राहुनही मुंबईवर नियंत्रण ठेवता आले असते. मात्र दिल्लीत राहुन मुख्यमंत्र्यांच्या कामात ढवळा ढवळ करणे योग्य नव्हते. तात्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांना मी पुन्हा राज्यात येण्यास नकार दिला होता. मात्र त्यांनी ‘ज्या जनतेने तुम्हाला आजवर निवडून दिले ती जनता धगीने होरपळ असल्याचे आपण कसे पाहू शकता’, असे म्हटल्यानंतर मी परत राज्यात आलो, असेही पवार एका प्रश्‍नाला उत्तर देताना म्हणाले. 

महाराष्ट्रापासून मुंबई तोडणारे कोणीच नाही 

बुलेट ट्रेेनला विरोध करण्यापेक्षा चंद्रपूर, नागपूर, कोल्हापूर अशी राज्य एकसंघ जोडणारी बिलेट ट्रेन करण्याची आम्ही मागणी केली. मुंबई-दिल्ली बुलेट ट्रेेन करण्यास आमचा विरोध नाही. सध्याची मुंबई - अहमदाबाद रेल्वेंची संख्या पाहता नव्या रेल्वेची गरज नाही. मात्र बुलेट ट्रेनच्या माध्यमातून महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. मात्र वरून जरी कोणी आले तरी मुंबई वेगळी होऊ शकत नाही. ती वेगळी करण्याची ताकद कोणाकडेही नाही. तसा कोणी प्रयत्न केला तर आपण गप्प बसणार आहोत का असा प्रश्‍न उपसिथत करत  विरार भागात गुजराथी भाषेचे बोर्ड दिसतात. आपण जागृत राहिले पाहिजे, असेही पवार म्हणाले.