Thu, Jun 27, 2019 09:58होमपेज › Pune › इंटरसिटी एक्स्प्रेसचा अपघात टळला

इंटरसिटी एक्स्प्रेसचा अपघात टळला

Published On: Aug 01 2018 1:33AM | Last Updated: Jul 31 2018 11:58PMपुणे/लोणावळा : प्रतिनिधी

खंडाळा घाटात मंकी हिल येथे रेल्वे रुळ तुटल्याचे पेट्रोलिंग कर्मचार्‍याच्या वेळीच लक्षात आल्याने मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसचा अपघात टळला. मंगळवारी (दि. 31) सकाळी साडेआठच्या सुमारास मध्य रेल्वेच्या डाऊन लाईनवर किलोमीटर क्रमांक 118 जवळ ही घटना घडली. 

मंगळवारी सकाळी रेल्वे कर्मचारी सुनील कुमार खंडाळा घाटात पेट्रोलिंग करत होते. त्या वेळी डाऊन लाईनवरील रुळामध्ये सुमारे तीन ते चार इंचांचे अंतर पडल्याचे त्यांच्या नजरेस पडले. यावरून रेल्वे गेली असती तर अपघाताची शक्यता होती. दरम्यान मुंबईहून पुण्याकडे जाणारी इंटरसिटी एक्सप्रेस तेथे पोचली. सुनील कुमार यांनी प्रसंगावधान राखत रेल्वेच्या चालकास इशारा करून गाडी थांबविण्यास सांगितले. चालकाने वेळीच गाडी थांबविल्याने इंटरसिटी एक्सप्रेसचा अपघात टळला. दरम्यान या प्रकारामुळे 12127 इंटरसिटी एक्स्प्रेस आणि 11007 डेक्कन एक्स्प्रेस सुमारे दीड तास उशिराने दाखल झाल्या. अन्य कोणत्याही रेल्वेला उशीर झाला नाही, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.