Mon, May 27, 2019 09:47होमपेज › Pune › स्वमग्नतेबाबत पालकांचे समुपदेशन आवश्यक

स्वमग्नतेबाबत पालकांचे समुपदेशन आवश्यक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : पूनम पाटील

प्रत्येक आईवडीलांना सुंदर गुटगुटीत व निरोगी मुल हवं असतं, परंतू जेव्हा एक ऑटीस्टीक किंवा स्वमग्न मुल जन्माला येते तेव्हा त्यांच्या संसाराची घडी विस्कटली जाते.  तसेच त्यांच्यात अनेकदा कलह निर्माण होतात. साहजिकच ही मुले दुर्लक्षीत केली जातात. अशावेळी त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी व त्यांचे भावविश्व खुलवण्यासाठी आईवडीलांचे व भावंडांचे समुपदेशन करणे गरजेचे ठरते. पालकांची नकारात्मक मानसिकता व न्युनगंड दुर झाला तरच या मुलांना मुख्य प्रवाहात आणणे शक्य होते, असे मत शहरातील मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

दोन एप्रिल हा दिवस जागतिक स्वमग्न जागृती दिवस म्हणून पाळला जातो. त्या पार्श्वभूमीवर शहरातील मानसोपचार तज्ज्ञांशी पालकांशी संवाद साधला. त्यावेळी अनेक बाबीसमोर आल्या. पालकांना आपली मुलं नेहमीच्या शाळेत जावे अशीच इच्छा असते. परंतू या शाळांमध्ये  स्वमग्न मुलांना इतर मुले भंडावून सोडतात. अशा वेळी स्पेशल एज्युकेशन देणार्‍या  शााळांमध्ये मुलांना दाखल केले तर त्यांच्या कलागुणांचा स्पेशल ट्रेनिंगद्वारे विकास करता येतो. त्यामुळे या मुलांना स्पेशल एज्युकेशनच दिले गेले पाहीजे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला. 

न्यूनगंडापायी पालक नोंद करत नाहीत 

दर दहा हजारात किमान आठ ते दहा मुले ही स्वमग्न असतात असे एक सर्वेक्षणाद्वारे समोर आले आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे न्युनगंडापायी पालक अशा मुलांची नोंदच करत ऩाहीत, त्यामुळे यांचे शहरात हजारामागे किती प्रमाण आहे हे समजणे कठीण  आहे.

स्वमग्न मुलांच्या पालकांना आर्थिक पाठबळ हवे

स्वमग्नता असणार्‍या मुलांच्या पालकांची बदली न करण्याचा आदेश केंद्रीय कार्मिक व प्रशिक्षण मंत्रालयातर्फे काही वर्षापूर्वी काढण्यात आला होता. केंद्रीय कर्मचार्‍यांना  यामुळे दिलासा मिळाला.  पण इतरांचे काय. विशेष मुलांच्या विशेष शिक्षणासाठी मोठया प्रमाणावर आर्थिक पाठबळ लागते. सर्वसामान्य पालकांना या मुलांसाठी विमा स्वरुपात किंवा आर्थिक पाठबळ मिळावे, अशी अपेक्षा या पालकांनी व्यक्त केली आहे. स्वमग्न मुलांसाठी आज शहरात पालकांनी सेल्फ हेल्प ग्रुप तयार केले आहेत. याद्वारे त्यांच्या वेदना समजून घेत स्वमग्नता असणार्‍या  या कळ्यांचे फुलात रुपांतर करण्यासाठी धडपडत आहेत. हा आजार असणार्‍या  मुलांचे आयुष्य जास्तीत जास्त चाळीस वर्षेच असल्याने त्यांनाही समाजात आपुलकीने सामावून घ्यावे, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.

ज्यावेळी तीन वर्षानंतर मुलांच्या स्वमग्नतेबाबत निदान होते. तेव्हा पालकांना हे स्विकारणे कठिण जाते. त्यामुळे पालकांपैकी कोणीतरी एक सुईसाईडल अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतात. ते होऊ नये यासाठी वेळोवेळी फालोअप घेणे गरजेचे आहे. आम्ही गेल्यानंतर मुलांचे काय असे विविध प्रश्न पालकांना पडतात. त्यावेळी तज्ज्ञ म्हणून पालकांना योग्य मार्गदर्शन केले जाते. त्यानंतर पालकांची मानसिक तयारी झाली की काही काळानंतर ते स्वतःच मुलांसाठी पॅटर्न डिझाईन करायला लागतात. यासाठी पालकांचे व भावंडाचे समुपदेशन अत्यावश्यक आहे.   -  डॉ. इंदू गुडगिला, मानसोपचार तज्ज्ञ
 

Tags : Pimpri, Pimpri news, Psychotherapy, parents, Conversation, 


  •