Fri, Feb 22, 2019 16:29होमपेज › Pune › पुणे : दिघीत पोलिसांच्या अंगावर मोटार घातली

पुणे : दिघीत पोलिसांच्या अंगावर मोटार घातली

Published On: Aug 13 2018 12:23PM | Last Updated: Aug 13 2018 12:23PMपिंपरी : प्रतिनिधी
गोमांस विक्री होत असल्याची खबर मिळाल्याने पाहणी करण्यास गेलेल्या पोलिसांच्या अंगावर गाडी घातली. यामध्ये दोन पोलीस जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. 

दिघी येथील मॅगझीन चौकाजवळ मोकळ्या जागेत गाईंची कत्तल केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी जात होते. पोलीस येत असल्याचे पाहून कत्तल करणाऱ्यांनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांच्या अंगावर मोटार घातली. 
पोलिसांनी घटनास्थळावरून जनावरांना बेशुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणारी औषध तसेच इंजेक्शन जप्त केली आहे. दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद कारण्याचे काम सुरू आहे.