पुणे : प्रतिनिधी
कोरेगाव भिमा हिंसाचाराच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या न्या. पटेल (निवृत) यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीचे कामकाज लवकरच सुरु होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली.
कोरेगाव भीमा येथील घटना घडून चार महिने होत आले आहेत; मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या न्यायालयीन चौकशीची घोषणा अद्याप अमलात आलेली नाही. त्यामुळे या घटनेची चौकशी तात्काळ सुरु करावी, यासह विविध मागण्यांसाठी अॅट्रॉसिटी अॅक्ट परिषदेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी आंदोलकांशी जिल्हाधिकार्यांनी संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक सुवेझ हक उपस्थित होते.
कोरेगाव-भिमा हल्ला व दंगल प्रकरणी राज्य शासनाच्या वतिने नेमण्यात आलेल्या उच्च न्यायालयाच्या सेेवानिवृत्त न्यायमुर्तींच्या वतिने करण्यात येणार्या न्यायालयीन चौकशी समतीचे कामकाज येत्या 27 व 28 एप्रिल रोजी पासुन सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी बेमुदत धरणे आंदोलन मागे घ्यावे, अशा विनंती केली. सदर प्रसंगी राहुल डंबाळे, सुवर्णा डंबाळे, अश्विन दोडके, धम्मराज साळवे, अंजना गायकवाड, आरतीताई साठे, सुनिल निकाळजे, राकेश लोंढे अदी सहभागी झाले होते.