Mon, Apr 22, 2019 05:42होमपेज › Pune › इंदू मिलप्रश्‍नी राज्य सरकारचे फक्त आश्‍वासन

इंदू मिलप्रश्‍नी राज्य सरकारचे फक्त आश्‍वासन

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 16 2018 1:13AMपुणे : प्रतिनिधी

इंदू मिलचे भूमीपूजन होऊन तीन वर्षांचा कालवधी उलटला आहे. तरीही राज्य शासनाकडून अद्यापही कामाला सुरुवात करण्यात आली नाही. हे सरकार फक्त आश्‍वासन देत आहे. अशी टीका रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबडेकर यांनी राज्य सरकारवर केली आहे. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

केंद्रातील काही नेते सत्तेला चिटकून  बसले आहेत. ते सरकारचे प्रतिनिधी आहेत, दलितांचे प्रतिनिधी नाहीत. भिमा कोरेगाव प्रकरणानंतर त्यांनी स्वत:हून राजीनामा द्यायला हवा होता, अशी टीका आंबेडकरांनी रामदास आठवलेंवर केली. 

दलितांचे प्रतिनिधी म्हणून आठवले सरकारमध्ये आहेत, त्यांच्याकडून इंदू मिलबाबत प्रयत्न सुुरु असल्याचे सांगितले जाते. मात्र, ते दलितांचे प्रतिनिधी नाहीत, तर सरकारचे प्रतिनिधी आहेत. जिकडे सत्ता असते, तिकडे ते चिकटतात. भिमा कोरेगाव सारख्या प्रकरणानंतर कोणत्याही दलित नेत्याने राजीनामा दिला असता, परंतु आठवलेंनी राजीनामा  दिला नाही. दलित ऐक्याचा विषय संपलेला आहे. 2019च्या निवडणुकीत दलितांचा खरा नेता कोण हे कळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य सरकार भिमा कोरेगाव प्रकरणात एकबोटे आणि भिडे गुरूजींंना अटक करत नाही. याप्रकरणी 20 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात एकबोटे यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी आहे, त्याठिकाणी रिपब्लीकन सेनेच्यावतीने अ‍ॅड. डॉ. सुनील न्यायालयात बाजू मांडून जामीनाला विरोध करणार आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदुस्थानी लष्कराचा अपमान केला आहे. त्यांनी पोलिसांचे संरक्षण नाकारून स्वयंसेवकांना कमांडो म्हणून ठेवावे असाही टोला आंबडेकरांनी लगावला