Wed, Apr 24, 2019 12:11होमपेज › Pune › पुणे : सहलीच्या ठिकाणी अपघात; सुमारे २० शाळकरी मुले जखमी

पुणे : सहलीच्या ठिकाणी अपघात; सुमारे २० शाळकरी मुले जखमी

Published On: Dec 15 2017 5:49PM | Last Updated: Dec 15 2017 6:33PM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

कृषी पर्यटनासाठी गेलेल्या शालेय सहलीत ट्रॅक्टर पलटून झालेल्या दुर्घटनेत जवळपास २० मुले जखमी झाली आहेत. त्यातील जवळपास तिघांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. वाकड येथील इंदिरा विद्यालयाच्या सहलीत हा अपघात घडला असून, एका विद्यार्थ्यावर पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तर इतर १९ जणांवर पुना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

या घटनेबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी, इंदिरा विद्यालयाची सहल पुणे-सासवड रस्त्यावरील गरड गावाजवळ इडन ऑफ व्हॉइसेस फार्म येथे गेली होती. कृषी पर्यटनासाठी गेलेल्या सहलीत ट्रॅक्टरमधून फेरफटका मारण्यात येत होता. सहलीत जवळपास २४० मुलांचा सहभाग होता. इतरांच्या फेऱ्या झाल्यानंतर शेवटच्या फेरीवेळी ट्रॅक्टर ट्रॉलीखाली मोठा दगड आल्याने ट्रॉली पलटली. ट्रॉली अंगावर पडून अनेक मुले जखमी झाली. दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात घडला. घटनास्थळावरून मुलांना पुण्यातील हॉस्पिटल्समध्ये हलविण्यात आले. 

अपघाताची माहिती कळताच पालकांनी हॉस्पिटल्समध्ये धाव घेतली. पुना हॉस्पिटलच्या बाहेर पालकांनी गर्दी केली होती.