Sun, May 19, 2019 13:59
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › निपाह व्हायरससाठी नायडू रुग्णालयात स्वतंत्र कक्ष

निपाह व्हायरससाठी नायडू रुग्णालयात स्वतंत्र कक्ष

Published On: Jun 01 2018 2:12AM | Last Updated: Jun 01 2018 12:10AMपुणे : प्रतिनिधी

केरळमध्ये निपाह व्हायरसचा फैलाव झाला. यावर खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या नायडू रुग्णालयात निपाहसाठी स्वतंत्र वार्ड तयार करण्याच्या सुचना आरोग्य विभागाला दिल्या असल्याचे अतिरिक्त आयुक्त शितल उगले यांनी सांगितले.

महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून शहरामध्ये निपाह यासंसर्गजन्य रोगावर उपचार करण्यासाठी ससून रुग्णालयामध्ये वार्ड तयार करावा अशी मागणी केली होती. ससून रुग्णालयामध्ये निपाहसाठी वार्ड तयार केल्यास अन्य रुग्णांमध्ये घबराट पसरेल असे उत्तर ससून रुग्णालयाकडुन देण्यात आले. महापालिकेचे नायडू रुग्णालय हे खास संसर्गजन्य रोगांवर उपचार करण्यासाठी आहे.

त्यामुळे महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून याच ठिकाणी वार्ड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यामध्ये निपाहचा अद्याप रुग्ण सापडलेला नाही. संशयीत सुध्दा कोणी नाही. केवळ खबरादारी म्हणून उपयोजना करत आहोत. पावसाळ्यामध्ये येणार्‍या साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी खबरदारी घेण्याच्या  सुचना पालिकेच्या आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर औषधांच्या पुरेसा साठा पालिका प्रशासनाकडे उपलब्ध असणार असल्याचे उगले यांनी सांगितले