Sun, Jun 16, 2019 12:22
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › स्वतंत्र पोलिस आयुक्तालय १५ ऑगस्टला : गिरीष बापट 

स्वतंत्र पोलिस आयुक्तालय १५ ऑगस्टला : गिरीष बापट 

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 20 2018 1:29AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयास शासनाकडून ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. त्यामुळे स्वतंत्र पोलिस आयुक्तालय येत्या पंधरा ऑगस्ट पासून सुरु होईल, त्यासाठी हालचाली सुरु आहेत, असे पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी शनिवारी चिंचवड येथे सांगितले. प्रेमलोक पार्क मधील महात्मा ज्योतिबा फुले शाळेच्या इमारतीमध्ये आयुक्तालय सुरु करण्यासाठी पुणे शहर, ग्रामीण पोलिस आणि लोकप्रतिनिधी यांचे एकमत झाले आहे. शनिवारी बैठकित सर्वात महत्वाच्या जागेवर चर्चा करण्यात आली तसेच इतरही बाबींचा आढावा घेण्यात आला.

मुख्यमंत्री यांच्या सांगण्यावरून चिंचवड स्टेशन येथील पोलिस उपायुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीस आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे, पुणे शहरचे अप्पर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे, पुणे पोलिस ग्रामीणचे अधिक्षक सुयेझ हक, मुख्यालय पोलिस उपयुक्त गायकर, गणेश शिंदे, सहायक पोलिस आयुक्त विक्रम पाटील, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अस्तेकर, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार इतर पदाधिकारी उपस्थित होते.

स्वतंत्र पोलिस आयुक्तलायासाठी तात्पुरत्या स्वरुपात भाडेतत्वावर इमारत पाहण्याचे काम सुरु आहे. महापालिकेच्या पाच इमारती पाहण्यात आलेल्या आहेत. पैकी प्रेमलोक पार्क येथील शाळेची इमारत सर्वाना सोयीस्कर वाटली असून ही इमारत मिळावी यासाठी महापालिका आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवला आहे. या जागेवर शनिवारी झालेल्या बैठकी एकमत झाले आहे. तर निगडी येथील मुलांची शाळा क्रमांक एक या ठिकाणी मुख्यालय आणि स्पाईन रोड मोशी येथे अधिकार्‍यांची कार्यलये यासाठीही सर्वांचे एकमत झाले आहे.

कायमस्वरूपीसाठी पहिलेला जागेचाही चर्चा करण्यात आली आहे. नवीन आयुक्तालयाची रचना, पोलिस ठाणे त्यासाठी लागणारे मनुष्यबळ याचाही प्रस्ताव तयार आहे. या सगळ्या बाबींचा आढावा बापट यांनी बैठक घेतलला. यावेळी अनेक विषयावर चर्चा झाली.

यावेळी आयुक्तालयसाठी इमारत लवकर निश्चित होणे गरजेचे असल्याचा सर्वांचे मत होते. आयुक्तालय हे मध्यवर्ती ठिकाणी असणे योग्य होणार असल्याचेही चर्चा झाली. इमारत निश्चित झाल्यानंतर फर्नीचर तसेच इतरही गोष्टी महत्वाच्या असणार आहेत. त्यासाठी सर्वांनी हालचाल करणे गरजेचे असल्याचे बापट यानी सांगितले.आजच्या बैठकीचा आहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. कायदेशीर सर्व प्रक्रिया पूर्ण करुन पंधरा ऑगस्ट पासून आयुक्तालयाचे कामकाज सुरु करु असे बापट यांनी सांगितले.