Tue, Feb 19, 2019 23:17होमपेज › Pune › कार अपघातात दोन प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा मृत्यू

कार अपघातात दोन प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा मृत्यू

Published On: May 10 2018 3:43PM | Last Updated: May 10 2018 3:43PMइंदापूर : प्रतिनिधी

पुणे-सोलापूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघात दोन प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. राकेश श्रीनिवास आणि माधव प्रसाद जहागीरदार (दोघे सध्या राहणार विजापूर) असे मृत्यूमुखी पडलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची नावे आहेत.

लोणी देवकर गावच्या हद्दीत आज पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. राकेश श्रीनिवास आणि माधव प्रसाद जहागीरदार ( दोघे रा.सध्या विजापूर) हे प्रशिक्षणार्थी डॉक्टर या अपघातात मरण पावले, तर विनोद एस.मठ (वय २३), सिध्दार्थ मजगी ( वय २४) दोघे सध्या रा.विजापूर हे जखमी झाले आहेत. हे सर्वजण विजापूर येथील वैद्‍यकीय महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून कार्यरत होते.
जखमींवर उपजिल्हा शासकीय रूग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्‍यांना दुसरीकडे हलवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.