Fri, Apr 26, 2019 17:43होमपेज › Pune › मधुमेहासह वाढतोय ‘मॅक्युलर एडीमा’

मधुमेहासह वाढतोय ‘मॅक्युलर एडीमा’

Published On: Jun 12 2018 12:53AM | Last Updated: Jun 12 2018 12:34AMपुणे : प्रतिनिधी

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये आता नवीन आजाराचा शिरकाव होत आहे. मधुमेहाच्या तीनपैकी एका रुग्णामध्ये ‘डीएमई’ अर्थात ‘डायबेटिक मॅक्युलर एडीमा’ हा विकार विकसित होताना दिसून येत आहे. या विकारात डोळयांतील रक्तवाहिन्यांना सूज येउन त्या गळू लागतात. त्यामुळे दृष्टि जाण्याचा धोका वाढतो. म्हणून आता मधुमेहाच्या रुग्णांनी साखरेबरोबरच डोळयांचे आरोग्य जपणे आवशक असल्याचे नेत्ररोगतज्ज्ञ सांगतात. 

राष्ट्रीय आकडेवारीनुसार भारतात 6 कोटी मधुमेही आहेत.  सामान्य लोकांच्या तुलनेत ‘डीएमई’ आजारात मधुमेहींना दृष्टी जाण्याचा धोका 25 पट अधिक असतो. त्यासाठी रेटिनाच्या विकारांच्या खुणा व लक्षणे ओळखण्यासाठी रुग्णाने कायम दक्ष राहणे गरजेचे आहे. याचे घरच्या घरी निदान करण्यासाठी नियमितपणे दृष्टी तपासण्यासाठी गडद ठिपका असलेल्या साध्या तक्त्याचाही उपयोग करता येउ शकतो. यातील ठिपक्याकडे पाहताना कोणतीही रेषा तुटल्यासारखी किंवा विचित्र दिसत असेल, तर डोळ्यांची व्यवस्थित तपासणी करणे आवशक असल्याचे नेत्रतज्ज्ञ सांगतात. या आजारावर लेसर फोटोकॉग्युलेशन, अ‍ॅण्टी-व्हीईजीएफ इंजेक्शन्स हे उपचार उपलब्ध आहेत.  

पुण्यात सुमारे 400 नेत्ररोगतज्ज्ञ कार्यरत असून डोळयांच्या विकारांवर क्लिनिकमध्ये सल्यासाठी जेव्हा रुग्ण येतात, तेव्हा नेत्रविकार पुढील टप्प्यावर गेलेला आढळतो. रेटिनाच्या विकारांबाबत जागरूकता नसल्याने विकाराच्या निदानाला खूप उशीर होतो. यातून ‘मॅक्यूलर एडिमा’ बाबत रुग्णांमधील जागरूकततेचा अभाव दिसून येत आहे.  ‘डीएमई’ चे सुरवातीच्या टप्यात निदान झाल्यास उपचारांद्वारे तो बरा होतो, अशी माहिती नेत्ररोगतज्त्र आणि शल्यचिकित्सक डॉ. नितीन प्रभुदेसाई यांनी दिली.