Thu, Jul 18, 2019 14:57होमपेज › Pune › धरणांतील पाणीसाठा वाढू लागला

धरणांतील पाणीसाठा वाढू लागला

Published On: Jul 12 2018 1:43AM | Last Updated: Jul 12 2018 1:11AMपुणे : प्रतिनिधी

पश्‍चिम महाराष्ट्रातील भीमा आणि कृष्णा खोर्‍यामध्ये असलेल्या सुमारे 38 धरणांपैकी काही धरणक्षेत्रात मागील आठवड्यापासून  मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोयना धरणामध्ये सर्वाधिक 44.69 टीएमसी (44.64 टक्के) पाणी जमा झाले आहे. तर उजनी धरणामध्ये मात्र सध्या उणे 7.12 (वजा) टीएमसी पाणीसाठा आहे.  जून महिन्यात मान्सून राज्याच्या सर्वच भागात पोहचला होता. मात्र अनुकूल स्थिती नसल्यामुळे पावसाने हजेरी लावली नाही. धरणक्षेत्रातसुध्दा पावसाने दडी मारल्यामुळे पाण्याची पातळी खालावली होती. त्यामुळे शेती आणि उद्योगधंद्यांनासुध्दा पाणीपुरवठा करणे कठीण झाले होते. परंतु जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यापासूनच हळूहळू धरणक्षेत्रात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आणि आठवडाभरात बहुतांशी धरणामध्ये निम्म्याच्या आसपास पाणी साठले आहे. 

उजनी धरणात चोवीस तासांत 1.43 टीएमसी पाणी जमा झाले आहे. तर खडकवासला  साखळी धरणक्षेत्रात  आजअखेर (दि.11) सर्व धरणात मिळून 11.26 टीएमसी पाणीसाठा झाला असल्याची माहिती मिळाली आहे.    भीमा खोर्‍यातील अजूनही एक ते दोन टीएमसीपेक्षा कमी पाणीसाठा असलेली धरणे पुढीलप्रमाणे :पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, घोड, विसापूर, कळमोडी, चासकमान, वडीवळे, आंद्रा, कासारसाई, टेमघर, खडकवासला, गुंजवणी, नाझरे, उजनी. कृष्णा खोर्‍यातील एक ते दोन टीएमसीपेक्षा कमी पाणीसाठा असलेली धरणे पुढीलप्रमाणे : तुळशी, कासारी, पाटगाव, धोम बलकवडी, तारळी.

भीमा खोर्‍यामधील धरणातील पाणीसाठा ; (टीएमसीमध्ये) : पिंपळगाव जोगे - 0, माणिकडोह- 1.24, येडगाव- 1.03, वडज - 026,  डिंभे- 2.19, घोड- 0.02, विसापूर- 0.11, कळमोडी- 1.43, चासकमान -1.60, भामा आसखेड- 3.28, वडीवळे- 0.70, आंद्रा- 1.83, पवना -3.76, कासारसाई- 0.27, मुळशी- 6.72, टेमघर-0.99, वरसगाव -3.17, पानशेत- 5.49, खडकवासला -1.07, गुंजवणी- 1.51, निरा देवधर -3.70, भाटघर-7.28, वीर-2.56, नाझरे-0.01, उजनी - उन्हे 7.12. कृष्णा खोर्‍यातील धरणांमधील पाणीसाठा : (टीएमसीमध्ये) : कोयना -44.69, धोम - 3.19, कण्हेर- 3.61, वारणावती -15.90, दूधगंगा-11.93, राधानगरी- 4.30, तुळशी-1.94, कासारी -1.89,  पाटगाव-2.29, धोम बलकवडी- 1.77, उरमोडी- 4.46, येरळवाडी- 0, तारळी-2.17.

धरण पाणीसाठा  : कोयना धरण 44.69 टीएमसी, वाराणावती- 15.90, दूधगंगा-11.93, राधानगरी-4.30, उरमोडी-4.46, भाटघर-7.28, पानशेत-5.49, मुळशी-6.82  टीएमसी.