Thu, Apr 25, 2019 11:37होमपेज › Pune › रस्त्यावर वाढदिवस साजरे करण्याचे वाढते ‘फॅड’

रस्त्यावर वाढदिवस साजरे करण्याचे वाढते ‘फॅड’

Published On: Jun 19 2018 1:26AM | Last Updated: Jun 19 2018 12:35AMमुंढवा : नितीन वाबळे

रात्री बारा वाजता वाढदिवस साजरा करताना फटक्यांची आतिषबाजी करण्याचे फॅड वाढीस लागले आहे. तसेच दुचाकीच्या पुंगळी करून जोरजोरात आवाज काढत वाहने चालवण्याची संस्कृती रूजू होत असल्याने सामाजिक स्वास्थ बिघडत आहे. घरामध्ये लहान बाळ, जेष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, हदयरुग्ण यांना ध्वनी प्रदुषणाचा प्रचंड त्रास होतो. अशा हिडिस प्रकारे वाढदिवस साजरा करून स्वतःच्या विकृत मानसिकतेचे प्रदर्शन करणा-यांवर स्थानिक पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

मुंढवा, केशवनगर, साडेसतरानळी घोरपडी, बी.टी. कवडे रस्ता, रामटेकडी, वैदुवाडी, मगरट्टा आदि परिसरात रात्रीच्या बारा वाजता फटाक्यांची आतषबाजी अनेकवेळा ऐकण्यास येते. त्यामुळे नागरिकांचा निद्रानाश होतो. आणि नंतर बराच वेळ झोप येत नसल्याने त्याच्या स्वास्थ्यावर मोठा परिणाम होतो. रात्री वाजलेल्या फटाक्यांची सकाळी चौकशी केली असता जवळच एखाद्या बगलबच्च्याचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्यासाठी ही विकृत कल्पना वापरली असल्याचे नागरिकांच्या समजते.

फटाक्यांची आतषबाजी करून ही मंडळी थांबत नाहीत. तर काही ठिकाणी डिजेही लावलेला असतो. तसेच त्याची मित्रमंडळी गल्लीबोळातून आणि मुख्य रस्त्यावर दुचाकीचा जोरजोरात आवाज करीत, किंचाळत असल्याचेही प्रकार होत असल्याचे नागरिक सांगतात. त्यामुळे आपल्याच नातेवाईकांना व शेजा-यापाजा-यांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होतो हे या बर्थडे पर्सनच्या ध्यानीमनीही नसते. असा वाढदिवस साजरा करून ही मंडळी दुस-यांचे शिव्याशाप खात असतात हे त्यांच्या लक्षात येत नाही. 

रात्री अपरात्री फटाक्यांचा आवाज आणि प्रकाशाच्या दिशेने रात्रीच्या गस्तीवरील पोलीसांनी धाव घेऊन संबंधीतांवर गुन्हे दाखल करावेत. अनेक वेळा शेजारीच राहणा-याने स्वतःचा किंवा त्यांच्या मुलाबाळांचा वाढदिवस अशा प्रकारे साजरा केलेला असतो. त्यामुळे नागरिक नाविलाजाने गप्प बसतात. त्यामुळेच पोलिसांनी अशा प्रकारच्या घटणेची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.