Sun, Mar 24, 2019 06:14होमपेज › Pune › कांद्याने आणले डोळ्यात पाणी

कांद्याने आणले डोळ्यात पाणी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

कर्नाटकातील लाल कांद्याचा हंगाम संपल्याने दक्षिणेकडील कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमधून राज्यातील कांद्याला मागणी वाढली आहे. परिणामी, कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. रविवारी मार्केटयार्डात तब्बल 150 ट्रक कांद्याची आवक झाली. दरम्यान, यामध्ये कच्चा कांद्याचे प्रमाण जास्त असूनही मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने कांद्याचे कडाडले दर कायम आहेत. पुढील महिनाभर हिच परिस्थिती कायम राहिल अशी शक्यता आहे.

रविवारी मार्केटयार्डात तब्बल 150 ट्रक कांद्याची आवक झाली. त्यांपैकी तब्बल 40 ते 50 ट्रक माल हा दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाठविण्यात येत आहे. परिणामी, शहरातील घाऊक बाजारात नविन कांद्यास 350 ते 450 रुपये आणि जुन्या कांद्यास 400 ते 520 रुपये भाव मिळाला आहे़  तर किरकोळ बाजारात नविन कांदा 40 ते 60 रुपये आणि जुना कांदा 50 ते 65 रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे़