Thu, Apr 25, 2019 05:46होमपेज › Pune › पिंपरीत महिला अत्याचारात वाढ

पिंपरीत महिला अत्याचारात वाढ

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रातिनिधी

देशासह, राज्यात सर्वच ठिकाणी महिला सुरक्षा आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न सुरू आहेत; मात्र पोलिस ठाण्यात दाखल होत असलेले महिला अत्याचारांचे प्रकार पाहून, हे प्रयत्न प्रामाणिकपणे केले जातात का, याबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहत आहे. 

शहरात गुंगीचे औषध देऊन; तसेच खरेदीला जाऊ असे सांगून सामूहिक बलात्कार; तसेच छेडछाड अशा धक्कादायक घटना घडलेल्या आहेत. विशेष म्हणजे अल्पवयीन, चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार करून त्यांचे खून केल्याचेही प्रकार घडले आहेत. शहरात गेल्या दहा महिन्यांत बलात्काराच्या 82 आणि विनयभंगाच्या 165 गुन्ह्यांची नोंद पोलिसांकडे आहे.

वाढत्या लोकसंख्येप्रमाणे गुन्ह्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पुणे पोलिसांच्या परिमंडळ तीनच्या हद्दीत काही वर्षांपूर्वी नोकरीनिमित्त पुण्यात, कस्पटे वस्ती वाकड येथे आलेल्या एका तरुणीला लिफ्टच्या बहाणा दाखविण्यात आला. हिंजवडी आयटी कंपनीत मुलाखतीसाठी जात असताना ‘कॅब’मधील नराधमाने त्याच्या इतर साथीदारांना फोन करून बोलावून घेतले. त्या तरुणीला दारू पाजली आणि एका डोंगराच्या परिसरात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर सांगवीत सैनिकी जागेमध्ये जवानांनी रात्रीच्या वेळी बोलत बसलेल्या जोडप्याला मारहाण करून तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. यासारख्या ा काळिमा फासणार्‍या धक्कादायक घटना घडलेल्या आहेत. 

निगडी, भोसरीच्या हद्दीत अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करून त्यांचे खून  केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मुंबईहून आजीकडे आलेल्या तरुणीशी ओळख करून, तिला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. त्यानंतर चिंचवडला एका तरुणीला शेजारी राहणार्‍या महिलेने आपण खरेदी करून येऊ, असे सांगून आणले. त्यानंतर काळभोरनगर येथे तिच्या ओळखीच्या तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. शहरात वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणार्‍या महिलांची संख्या मोठी आहे;  तसेच सार्वजनिक वाहतूक करणार्‍या वाहनांनी प्रवास करणार्‍या महिलाही आहेत. या दोन्ही ठिकाणी महिलांचा  विनयभंग, छेडछाड होत आहेत. काही पुरुष महिलांची छेडछाड करतात आणि त्यामुळे महिला असुरक्षित असतात. वाकडच्या हद्दीत विनयभंगाच्या तब्बल 45 घटना घडलेल्या आहेत.

परिमंडळ तीनच्या हद्दीतील पिंपरी पोलिस ठाण्यात बलात्काराच्या 14 आणि विनयभंगाच्या 25, भोसरीच्या हद्दीत बलात्काराच्या 10 आणि विनयभंगाच्या 14, निगडीच्या हद्दीत बलात्काराच्या 14 आणि विनयभंगाच्या 15, चिंचवडच्या हद्दीत बलात्काराच्या 2 आणि विनयभंगाच्या 4, एमआयडीसी भोसरीच्या हद्दीत बलात्काराच्या 8 आणि विनयभंगाच्या 20, हिंजवडीच्या हद्दीत बलात्काराच्या 2 आणि विनयभंगाच्या 21, सांगवीच्या हद्दीत बलात्काराच्या 10 आणि विनयभंगाच्या 17, वाकडच्या हद्दीत बलात्काराच्या 14 आणि विनयभंगाच्या 45 घटना घडलेल्या आहेत.