Tue, Mar 19, 2019 03:13होमपेज › Pune › ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत वाढ

‘पीएमआरडीए’च्या हद्दीत वाढ

Published On: Jan 20 2018 1:41AM | Last Updated: Jan 20 2018 1:13AMपुणे : प्रतिनिधी 

राज्य शासनाने शुक्रवारी (दि. 18) काढलेल्या अधिसूचनेनुसार, ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत आता वाढ होणार आहे. त्यामुळे यापूर्वीची 7 हजार 256.46 चौरस किमीची हद्द आणखी विस्तारणार असून, पीएमआरडीएचा व्याप वाढणार आहे.  

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांचा वाढता विस्तार थांबविण्यासाठी राज्य शासनाने पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण  (पीएमआरडीए) स्थापन केले आहे. परिसराचा विकास करण्याच्या धोरणानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकाबरोबरच ‘पीएमआरडीए’च्या कक्षेत येणार्‍या नगरपालिकांच्या क्षेत्राचा विकास होत आहे. 

हद्दवाढीत समाविष्ट होणारी गावे - 

पूर्व शिरूर तालुक्यातील तरडोबाचीवाडी, गोळेगाव, चव्हाणवाडी, निमोणे, न्हावरा, खोकडवाडी, आंदळगाव, नागरगावची पूर्व हद्द ते दौंड तालुक्यातील गणेशरोड, नानगाव, वरवंडच्या पूर्व हद्दीपर्यंत. दक्षिण दौंड तालुक्यातील बोरीपार्धी, वाखारी, भांडगाव, यवत, भरतगाव, ताम्हणवाडी, डाळींब या गावांची दक्षिण हद्द, हवेली तालुक्यातील शिंदवणे गावाची दक्षिण हद्द, पुरंदर तालुक्यातील गुर्‍होळीची पूर्व हद्द, सिंगापूर गावाची पूर्व व दक्षिण हद्द, उदाचीवाडी, कुंभारवळण गावची दक्षिण हद्द ते पिंपळे गावची पूर्व हद्द, बोर्‍हाळवाडी या गावची पूर्व हद्द, पाणवडी गावची पूर्व व दक्षिण हद्द, घेरा पुरंदर, भैरावाडी, मिसाळवाडी या गावांची दक्षिण हद्द,

कुंभोशी गावची पूर्व व दक्षिण हद्द, भोर तालुक्यातील मोरवाडी, वाघजवाडी, भोंगवली, पांजळवाडी, टपरेवाडी, गुणंद या गावांची पूर्व हद्द, गुणंद, वाठारहिंगे, न्हावी, राजापूर, पांडे, सारोळे, केंजळ, धांगवडी, निगडे, कापूरहोळ, हरिश्चंद्री, उंबरे, सांगवी खुर्द, निधान, दिडघर, बिरवडे, जांभळी, सांगवी बुद्रुक या गावांची दक्षिण हद्द, वेल्हे तालुक्यातील आंबवणे, करंजावणे, अडवली, मार्गासणी, आस्कावाडी, विंझर, मळवली, लासिरगाव, दापोडे या गावांची दक्षिण हद्द, वेल्हे तालुक्यातील दापोडे गावची पश्चिम हद्द ते खामगाव गावची दक्षिण हद्द ते रुळे, कडवे, वडघर, आंबेगाव बुद्रुक, दिसली, शिरकोळी, थानगाव, पोळे, माणगाव या गावांची दक्षिण हद्द, माणगाव आणि कशेडी या गावांची पश्चिम हद्द, मुळशी तालुक्यातील ताव व गडले गावांच्या दक्षिण हद्दीपर्यंत.

पश्चिम मुळशी तालुक्यातील धामण ओहोळ, ताम्हिणी बुद्रुक, निवे, पिंपरी, घुटके, एकोले, तैलबैला, सालतर, माजगाव, आंबवणे, पेठ शहापूर, देवघर या गावांची पश्चिम हद्द, मावळ तालुक्यातील आटवण, डोंगरगाव, कुणेनामा, उधेवाडी, जांभवली, कुसूर, खांड, सावले या गावांची पश्चिम हद्द, उत्तर मावळ तालुक्यातील माळेगाव बुद्रुक, पिंपरी, माळेगाव खुर्द, कुणे, अनसुटे, इंगळून, किवळे, कशाळ, तलाट या गावांची उत्तर हद्द, खेड तालुक्यातील वाफगाव, तोरणे बुद्रुक, हेतरूज, कोहिंडे बुद्रुक, गारगोटवाडी,

कडुस या गावांची उत्तर हद्द, चास गावची पश्चिम हद्द ते कमान, मिरजेवाडी गावची उत्तर हद्द, काळेचीवाडी, आरुडेवाडी, सांडभोरवाडी, गुळाणी, चिचबायवाडी, जऊळके बुद्रुक, वाफगाव, गाडकवाडी या गावांची उत्तर हद्द, शिरूर तालुक्यातील थापटेवाडी, माळवाडी, खैरेनागद, कान्हूरमेसाई, मिडगुळवाडी, मलठण, आमदाबाद, अण्णापूर, शिरूर या गावांची उत्तर हद्द अशी हद्दवाढ करण्यात आली आहे.