Fri, Feb 22, 2019 16:41होमपेज › Pune › आयकर विभागाच्या लिपिकाची आत्महत्या

आयकर विभागाच्या लिपिकाची आत्महत्या

Published On: May 01 2018 1:22AM | Last Updated: May 01 2018 12:42AM पिंपरी : प्रतिनिधी

आकुर्डी येथील आयकर विभागात काम करणार्‍या लिपिकाने आजाराला कंटाळून आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ‘भगवान अभ भी नही चाहते मै ठिक हूँ, मुझे सोसायटी और कार्यालयीन साथियोने बहुत हेल्प किया, मै जो कदम उठा रहा हूँ उसे कोई जिम्मेदार नही है’ अशी चिठ्ठी पोलिसांना आढळुन आली आहे. हा प्रकार आकुर्डी येथील आयकर कॉलनीमध्ये रविवारी संध्याकाळी घडला.

बबलु कुमार चंद्रेश्‍वर प्रसाद (32, रा. आकुर्डी आयकर वसाहत) असे आत्महत्या केलेल्या लिपीकाचे नाव आहे. पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार बबलु हे त्यांच्या आईसोबत आयकर कॉलनीमध्ये राहत होते. रविवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेवून त्यांनी आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच निगडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी जाऊन पाहणी व चौकशी केली. बबलु यांना आजाराने ग्रासले होते. या आजारामुळेच त्यांचा पाय काढावा लागला. तेव्हापासून ते नैराश्यात होते. यातच अनेक ठिकाणांहून पैसे उचलून कर्ज केले होते. अनेक ठिकाणचे कर्ज फेडले होते. मात्र, नातेवाईकांचे कर्ज बाकी होते. यामुळे बबलु हे नेहमी नैराश्यात असायचे.

रविवारी आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. यामध्ये माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरु नये असे लिहले आहे. मी अनेकांचे कर्ज घेतले होते त्यापैकी काही नातेवाईकांचे कर्ज राहिले असून ते फेडायचे आहे असे म्हटले आहे. मला आजारपणात राहत असलेल्या सोसायटीमधील तसेच कार्यालयीन सहकार्‍यांनी चांगली मदत केली. मात्र भगवान आताही मला व्यवस्थित करण्यास तयार नाही, असे चिठ्ठीमध्ये लिहले आहे. या प्रकरणाचा तपास निगडी पोलिस करत आहेत.

Tags : Pimpri, Income Tax, Departments, Clerk, Suicide