Wed, Nov 21, 2018 04:19



होमपेज › Pune › पिंपरीत आयकर विभागातील लिपीकाची आत्महत्या

पिंपरीत आयकर विभागातील लिपीकाची आत्महत्या

Published On: Apr 30 2018 12:17PM | Last Updated: Apr 30 2018 12:17PM



पिंपरी : प्रतिनिधी

आकुर्डी येथील आयकर विभागात काम करणार्‍या लिपीकाने राहत्‍या घरात गळफास घेऊण आत्महत्या केली. आजाराला कंटाळून या लिपीकाने आत्‍महत्‍या केली आहे. बबलु कुमार चंद्रेश्‍वर प्रसाद (३२, रा. आकुर्डी आयकर वसाहत) असे आत्महत्या केलेल्या लिपीकाचे नाव आहे. ‘भगवान अभ भी नही चाहते मै ठिक हूँ, मुझे सोसायटी और कार्यालयीन साथियोने बहुत हेल्प किया, मै जो कदम उठा रहा हूँ उसे कोई जिम्मेदार नही है’ अशी चिठ्ठी बबलु याच्या घरात पोलिसांना आढळून आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबलु हे त्यांच्या आईसोबत आयकर कॉलनीमध्ये राहत होते. रविवारी सायंकाळी राहत्‍या घरात गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच निगडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी व चौकशी केली. बबलु यांना आजाराने ग्रासले होते. या आजारामुळेच त्यांचा पाय काढावा लागला होता, तेंव्हापासून ते नैराश्यात होते. यातच अनेक ठिकाणाहून पैसे उचलून कर्ज केले होते. त्‍यांनी अनेक ठिकाणचे कर्जही फेडले होते. मात्र, नातेवाईकांचे कर्ज बाकी होते. यामुळे बबलु नेहमी नैराश्यात असयाचे.

रविवारी आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे. यामध्ये माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरु नये असे लिहले आहे. मी अनेकांचे कर्ज घेतले होते पैकी नातेवाईकांचे कर्ज राहिले असून, ते फेडायचे आहे असे म्हटले आहे. मला आजारपणात राहत असलेल्या सोसायटीमधील तसेच कार्यालयीन सहकार्र्‍यांनी चांगली मदत केली. मात्र, भगवान आताही मला व्यवस्थित करण्यास तयार नाही, असे त्‍यांनी चिठ्ठीत लिहले आहे. याबाबत निगडी पोलिस अधिक तपास करत आहेत.
 

Tags : pimpri chinchwad akurdi, Income Tax Department, Clerical, suicide