Tue, Mar 19, 2019 09:58होमपेज › Pune › समाविष्ट ११ गावांच्या विकासासाठी निधी देणार 

समाविष्ट ११ गावांच्या विकासासाठी निधी देणार 

Published On: Dec 08 2017 1:42AM | Last Updated: Dec 07 2017 11:45PM

बुकमार्क करा

खडकवासला : वार्ताहर 

शिवणे, उत्तमनगर सह महापालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या सर्व 11 गावांच्या विकासासाठी पुरेसा निधी देण्यात येणार आहे. अशी स्पष्ट ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी उत्तमनगर येथे शिवणे कोढंवे धावडे रस्त्याच्या काँक्रीटकरणाच्या भुमीपुजनप्रसंगी दिली.

आमदार भिमराव तापकीर, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, किरण दगडे, दिलीप वेडे पाटील, हवेली पंचायत समितीच्या सदस्या उषा नाणेकर, भाजपचे खडकवासला अध्यक्ष अरुण राजवाडे, किरण बारटक्के, अरूण दागंट, प्रविण दागंट आदी उपस्थित होते. संयोजन सुभाष नाणेकर यांनी केले. कोंढवे धावडे येथील पाणी पुरवठा योजना महापालिकेच्या ताब्यात घेऊन देखभाल दुरूस्तीसाठी तरतूद करण्याचे तसेच उत्तमनगर येथील उपबाजारात भाजीपाला विक्रेत्यांचे लवकर स्थलांतर केले जाणार आहे. असे पालकमंत्र्यानी सांगितले. 9 कोटी 70 लाख रुपये खर्च करुन शिवणे रस्त्याचे काँक्रीटकरण तसेच डांबरीकरण केले जाणार आहे. साईड पट्ट्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार भिमराव तापकीर यांनी सांगितले.