Wed, Nov 14, 2018 23:55होमपेज › Pune › पालकमंत्र्यांआधीच राष्ट्रवादीने उरकले शाळेचे उद्घाटन

पालकमंत्र्यांआधीच राष्ट्रवादीने उरकले शाळेचे उद्घाटन

Published On: Jan 18 2018 1:46AM | Last Updated: Jan 18 2018 12:32AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते उद्या गुरुवारी फुगेवाडी शाळेचे उद्घाटन होणार असताना आजच राष्ट्रवादीने या शाळेचे उद्घाटन  उरकून टाकले. राष्ट्रवादीच्या स्थानिक नगरसेवकांना या कार्यक्रमाचे साधे निमंत्रण न दिल्याच्या निषेधार्थ हे उद्घाटन केल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सांगितले. 

संजोग वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उद्घाटन सोहळ्यास महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक रोहित काटे, माई काटे, राजू बनसोडे;  तसेच नाना काटे, उषा काळे, सुलोचना धर, निकिता कदम, विशाल काळभोर, शेखर काटे, कविता खराडे, आदी उपस्थित होते

या वेळी संजोग वाघेरे म्हणाले की, फुगेवाडी येथील मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालय व लोकमान्य टिळक मुले व मुलींचे प्राथमिक विद्यालय इमारतीचे भूमिपूजन राष्ट्रवादीच्या काळात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले होते. या शाळेच्या उद्घाटनास आमचा विरोध नाही; मात्र सत्ताधारी भाजपाने राष्ट्रवादीच्या स्थानिक नगरसेवकांना साधे विचारले नाही, कार्यक्रमाचे निमंत्रणही दिले नाही, म्हणून त्याच्या निषेधार्थ आम्ही आज शाळेचे उद्घाटन उरकून घेतले.