Sat, Feb 23, 2019 01:57होमपेज › Pune › महाराणा प्रतापसिंह व शिवरायांचा त्याग प्रेरणादायी : पर्यटनमंत्री रावल

महाराणा प्रतापसिंह व शिवरायांचा त्याग प्रेरणादायी : पर्यटनमंत्री रावल

Published On: Jun 17 2018 1:37AM | Last Updated: Jun 17 2018 12:45AMपिंपरी : प्रतिनिधी

देशाच्या सोनेरी इतिहासात महापराक्रमी महाराणा प्रतापसिंह व छत्रपती शिवाजी महाराज या दोन महापुरुषांची नावे आदराने घेतली जातात. त्यांचे देशप्रेम व त्यांनी देशासाठी केलेला त्याग भारतीयांना प्रेरणादायी असाच आहे, असे मत राज्याचे रोजगार हमी व पर्यटन मंत्री  जयकुमार रावल यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील प्रभाग 13 मधील  महाराणा प्रतापसिंह उद्यानातील त्यांच्या अर्धाकृती पुतळयावरील मेघडंबरीचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.  यावेळी आमदार महेश लांडगे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, विरोधी पक्षनेता दत्तात्रय साने, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे,  अ  प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे आदी उपस्थित होते.

रावल म्हणाले, महाराणा प्रतापसिंह व छत्रपती शिवाजी महाराज या दोन महापुरुषांनी एकाच युगात जन्म घेतला असता तर संपूर्ण जगावर त्यांनी निर्विवाद सत्ता गाजवली असती. त्यांच्यामध्ये अफाट सामर्थ्य आणि कर्तृत्व होते. त्यामुळे लोकांनी महाराणा प्रतापसिंह व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचे वाचन केले पाहिजे. महापौर नितीन काळजे म्हणाले, महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अर्धाकृती पुतळयावर मेघडंबरीचे काम महापालिकेने त्वरित केले असून महापालिकेने सुशोभिकरणाची कामे वेळेत पार पाडली. प्रास्ताविक सत्तारुढ पक्षनेते एकनाथ  पवार यांनी केले. आभार कैलास चव्हाण यांनी मानले.