Wed, Apr 24, 2019 11:46होमपेज › Pune › शहरात आज पाणी नाही उद्या कमी दाबाने पाणी

शहरात आज पाणी नाही उद्या कमी दाबाने पाणी

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 10 2018 12:34AMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेच्या पर्वती जलकेंद्र अखत्यारीतील पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे आणि होळकर पंपिंग येथील विद्युतविषयक देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यासाठी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा आज (गुरुवारी) बंद राहणार असून, उद्या (शुक्रवारी) सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. 

पाणीपुरवठा बंद असणार्‍याा भागांमध्ये पर्वती जलकेंद्रांतर्गत शहरातील सर्व पेठा, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट, सहकारनगर, सातारा रोड, कात्रज, इंदिरानगर, कर्वे रोड ते एसएनडीटी, संपूर्ण कोथरूड, कोंढवा, वडगाव जलकेंद्र परिसरातील हिंगणे, धायरी, आंबेगाव पठार, कोंढवा बुद्रुक या परिसराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे. चतु:शृंगी, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र परिसरातील पाषाण, खडकी, चतु:शृंगी, बावधन, चांदणी चौक, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धिकरण परिसर, भूगाव रोड. नवीन होळकर पंपिंग परिसरातील विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, नगर रोड, लष्कर जलकेंद्र अखत्यारीतील लष्कर भाग, पुणे स्टेशन, कोरेगाव पार्क, ताडीवाला रोड, कोंढवा, हडपसर, मुंढवा, येरवडा, नगररस्ता, वडगाव शेरी, खराडी, सोलापूर रस्ता या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.