Mon, Jun 24, 2019 20:58होमपेज › Pune › शासकीय जमीन लाटल्या प्रकरणीचा खटला : म्हैसकर, गाडगीळ यांना वगळले

शासकीय जमीन लाटल्या प्रकरणीचा खटला : म्हैसकर, गाडगीळ यांना वगळले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

लोणावळा तालुक्यातील पिंपलोळी आणि मावळ तालुक्यातील ओझारडे गावातील सरकारी जमीन फसवणूक करून विकत घेतल्याच्या प्रकरणात आयआरबी कंपनीसह 18 जणांविरोधात डिसेंबर महिन्यात आरोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर, सीबीआय न्यायालयाने अवघ्या चार महिन्यांनी आर्यन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.चे संचालक वीरेंद्र दत्तात्रय म्हैसकर (46, रा. चांदवली फार्म रस्ता, अंधेरी पूर्व), दत्तात्रय गाडगीळ (62, रा. मैफल अपार्टमेंट, कर्वेनगर), आर्यन इन्फ्रास्ट्रक्चर आणि आयआरबी कंपनीला खटल्यातून वगळण्याचा आदेश दिला आहे. विशेष न्यायाधीश ए. के. पाटील यांनी हा आदेश दिला आहे.

दत्तात्रय गाडगीळ (62, रा. कर्वेनगर), आर्यन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.चा संचालक वीरेंद्र दत्तात्रय म्हैसकर (46, रा. अंधेरी पूर्व), आर्यन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड, अ‍ॅड. अजित कुलकर्णी (58, रा. पौड रोड, कोथरूड), ज्यो डेव्हलपमेंट कार्पोरेशनची मालक ज्योती कुलकर्णी (56, रा. गणेशकृपा सोसायटी), लोणावळा येथील सब रजिस्ट्रार अश्‍विनी क्षीरसागर (60, कसबा पेठ, पुणे), मावळ येथील सब रजिस्टार अनंत काळे (61, काळेवाडी, चर्‍होली बुद्रुक), सखाराम हराळे (41, रा. बीड), संतोष भोत्रा (रा. कोथरूड), नवीनकुमार राय (रा. कर्वेनगर), शांताराम दहिभाते (63, रा. बेडसे, ता. मावळ), विष्णू बोंंबले (62, रा. मावळ), अतुल भेगडे (45, रा. तळेगाव दाभाडे), अशोक कोंडे (44, रा. टाकवे बुद्रूक, मावळ), नरिंदर खंडारी (77, रा. लोणावळा), सिराज बागवान (49, बाणेर), पंकज ढवळे (35, कामशेत) यांच्यावर डिसेंबर महिन्यात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेे. माहिती अधिकार कार्यकर्ता सतीश शेट्टी यांनी 15 ऑक्टोबर 2009 मध्ये आर्यन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.चा व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर याच्यासह इतर 15 जणांविरोधात लोणावळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांनी पिंपलोळी आणि मावळ तालुक्यातील ओझारडे गावातील सरकारी जमीन फसवणूक करून विकत घेतली होती. 

यासाठी त्यांनी बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याबाबत शेट्टी यांनी याबाबत फिर्याद दिली होती. पुढे या प्रकरणात वडगाव मावळ येथील न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. 27 डिसेंबर 2012 मध्ये हा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला. याच दरम्यानच्या काळात 13 जानेवारी 2010 रोजी सतीश शेट्टी यांची निर्घृण हत्या झाली. त्यानंतर उच्च न्यायालयाने गुन्ह्याचा तपास ‘सीबीआय’कडे सोपविला. तसेच जमीन हडप केल्याप्रकरणात समांतर तपास करण्यासाठी ‘सीबीआय’ने रिटपिटीशन दाखल केले. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा त्वरित तपास करण्याचा आदेश दिला होता.

2007 ते 2009 च्या कालावधीत दीपक गाडगीळ, आर्यन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. आणि आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सचा व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर, अ‍ॅड. अजित कुलकर्णी, ज्यो डेव्हलपमेंट कार्पोरेशनची मालक ज्योती कुलकर्णी (56, रा. गणेशकृपा सोसायटी), लोणावळा येथील सब रजिस्ट्रार अश्‍विनी क्षीरसागर तसेच इतरांनी पिंपलोळी येथील जमीन हडप करण्यासाठी कट रचल्याचे नमूद केले होते. त्यासाठी ‘आयआरबी’च्या समांतर दोन कंपन्या स्थापन करण्यात आल्या. आर्यन इन्फ्रास्ट्रक्चर आणि ज्यो नावाने  या दोन कंपन्यांनी शेतकर्‍यांकडून 73.88 हेक्टर जमीन स्वतःकडे हस्तांतरित केली. ही जमीन आयआरबी कंपनीच्या नावे करून शासकीय जमीन हडप केली.


  •