Wed, Apr 24, 2019 01:31होमपेज › Pune › अनेक ठिकाणी वाहतूककोंडी

अनेक ठिकाणी वाहतूककोंडी

Published On: Jun 22 2018 2:05AM | Last Updated: Jun 22 2018 12:45AMपुणे : प्रतिनिधी

शहरातील विविध ठिकाणी वाहतूककोंडीचा फटका नागरिकांना सहन करावा लागला. विशेषतः टिळक रस्त्यावर दिवसभर वाहतूक संथ गतीने सुरू होती. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. तर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौर्‍यामुळे वाहतूक कर्मचार्‍यांची कमतरता अनेक चौकात आढळून आली. परिणामी बेशिस्त वाहनचालकांकडून सिग्नल तोडणे, वेडीवाकडी वाहने चालविल्यामुळे वाहतूककोंडीत अधिकच भर पडली होती.

वाहतूककोंडीमुळे महाविद्यालयात प्रवेशासाठी आलेले विद्यार्थी, पालक, स्थानिक व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागला. बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, जेधे चौक, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता परिसरातील वाहतुकीचा वेग संथ होता. त्यातच सायंकाळी चारच्या सुमारास पावसाच्या हजेरीमुळे वाहतूककोंडीत अधिकच भर पडली. घरी परतणार्‍या चाकरमान्याना वाहतूककोंडीत अडकून पडावे लागले. तसेच ठिकठिकाणच्या चौकात वाहतूक संथ गतीने सुरू असल्याने वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला.