Sat, Aug 24, 2019 23:17होमपेज › Pune › जूनमधये शेतकरी उतरणार पुन्‍हा रस्‍त्‍यावर

जूनमधये शेतकरी उतरणार पुन्‍हा रस्‍त्‍यावर

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 10 2018 11:42PMपुणे प्रतिनिधी

शेतकरयांच्‍या प्रलंबित मागणयांसाठी काढणयात आलेल्‍या लाँग मार्च नंतर शासनाने मान्‍य केलेल्‍या मागणयांच्‍या अंमलबजावणीसाठी व अन्‍य मागणयांसाठी आखिल भारतीया किसान सभेने पुन्‍हा एकदा रस्‍यावर उतरणयाचा निर्णय घेतला आहे.गतवर्षी राज्‍यात पुकारणयात आलेल्‍या ऐतिहासिक शेतकरी संपाला 1 जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे.या पाशर्वभूमीवर राज्‍यातील सर्व समविचारी संघटनांना सोबत घेवून आखिल भारतीया किसान सभा सर्व सरकारी कार्यालयांना घेराव घालून तीव्र आंदोलन करणार असल्‍याचा इशारा किसान सभेचे नेते डॉ.अजित नवले यांनी पत्रकार .सभेत दिला आहे.यावेळी बाबा नवले ,डॉ.अमोल वाघमारे ,नाथा शिंगाडे ,अजित अभयंकर ,डॉ.महेंद्र डाळे ,ज्ञानेशवर मोटे ,सोमनाथ निर्मळ उपस्‍थित होते.

यावेळी बोलताना नवले म्‍हणाले ,शेतकरी संपानंतर शेतकरयांनी नाशिक ते मुंबई असा पायी लाँग मार्च काढला होता.शासनाने याची दखल घेवून काही मागणया मान्‍य केल्‍या होत्‍या.यात स्‍वामिनाथन आयोगाच्‍या शिपारशींची अंमलबजावणी करावी,शेतकरयांना संपूर्ण कर्जमापी,वीज बिल माप ,स्‍वस्‍त दरात बियाणे उपलब्‍ध करून देणे,वनाधिकार कायदयाची अंमलबजावणी करणे,कषटकरी शेतकरी व शेत मजुरांना पेन्‍शन देणे.आदी मागणयांचा समावेश होता..समिती स्‍थापन करून दिड महिन्‍यात या मागणयांची अंमलबजावणी केली जाईल असे शासनाने आशवासन दिले होते.राज्‍य कृषि मूल्‍य आयोगाची स्‍थापना ,नियम व कार्यपधदती याबाबत शासनाने अदयाप कोणतीही पावले उचलली नाहीत.आंदोलकांना केवळ खोटी आशवासने देवून दिशाभूल करायची अशीच सधया सत्‍ताधारयांची भूमिका दिसते.शासनाला त्‍यांनी दिलेल्‍या आशवासनांची आठवण करून देणयासाठी येत्‍या 1 जूनला राज्‍यातील सर्व सरकारी कार्यालयांना घेराव घातला जाणार आहे.तसेच सहयांची मोहिम राबवून दहा कोटी सहया गोळा करून पंतप्रधानांना पाठवणयात येणार आहेत.त्‍यानंतर देशव्‍यापी लढयाची घोषणा करणयात येणार आहे.महाराषट्रातून 20 लाख सहया गोळा करणयात येणार आहेत.

Tags:In june farmers come on street pune news