होमपेज › Pune › नदीपात्रामध्ये निर्माण झाला गालीचा

नदीपात्रामध्ये निर्माण झाला गालीचा

Published On: Mar 21 2018 2:10AM | Last Updated: Mar 21 2018 12:32AMखडकी : वार्ताहर :

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये मुळा नदी पात्रात आता मोठ्या प्रमाणावर जलपर्णी निर्माण झाली आहे. जलपर्णीमुळे नदीचे पात्र गालिच्यासारखे दिसत असून जलपर्णीमुळे मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नदीपात्रातील जलपर्णीमुळे डास निर्माण झाली असून  नागरिक हैराण झाले असल्याने जलपर्णी लवकरात लवकर काढण्यात यावे, अशी मागणी खडकीकर करीत आहेत.

बोर्डाच्या हद्दीमध्ये होळकर पुलाखालील मुळा नदी पात्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर जलपर्णी जमा झाली आहे. जलपर्णीमुळे नदीपात्रात हिरवेगार दिसत असून जलपर्णीमुळे मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नदीपात्रातील जलपर्णीमुळे डासांचा त्रास वाढल्याने नागरिक त्रस्त झाले असून नदीपात्रातील जलपर्णी लवकरात लवकर काढण्यात यावी अशी मागणी खडकीकर करीत आहेत.

दरम्यान नदीपात्रातील जलपर्णी लवकरात लवकर काढण्यात येणार असल्याचे बोर्डाचे नवनिर्वाचित आरोग्य अधीक्षक बी. एस.नाईक यांनी सांगितले. जलपर्णी त्वरित काढण्याबाबत बोर्डातील सदस्यांनी देखील याबाबत सूचना केल्या असल्याचे नाईक म्हणाले.दरम्यान बोर्डाच्या हद्दीमध्ये दररोज औषध फवारणी तसेच धूर फवारणी करण्यात येत असल्याचे नाईक यांनी सांगितले.

Tags : pune, pune news, Mula river, bed, large, scale, jalaparni