Fri, Apr 26, 2019 01:45होमपेज › Pune › मावळात कोतवाल भरती प्रक्रिया सुरू

मावळात कोतवाल भरती प्रक्रिया सुरू

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 08 2018 12:11AMवडगाव मावळ : वार्ताहर

मावळ तालुक्यातील करंजगाव, शिवणे, कोथुर्णे, करुंज, वराळे, सोमाटणे, लोणावळा, बऊर व टाकवे खु. या 9 सजांसाठी कोतवाल भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली असून मंगळवार (दि.8) पासून दि.15 पर्यंत इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करावेत, अशी माहिती तहसिलदार रणजीत देसाई, नायब तहसिलदार सुनंदा भोसले यांनी दिली.

संबंधीत सजांच्या कोतवाल पदांसाठी आरक्षणांचा संवर्गही निश्‍चित करण्यात आला असून यामध्ये करंजगाव (सर्वसाधारण), शिवणे (सर्वसाधारण स्त्री), कोथुर्णे (भटक्या जमाती क), करूंज(सर्वसाधारण), वराळे(भटक्या जमाती ड), सोमाटणे (भटक्या जमाती क स्त्री), लोणावळा (सर्वसाधारण), बऊर (विषेश मागास प्रवर्ग) व टाकवे खु.(सर्वसाधारण) या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.कोतवाल भरतीसाठी दि.8 ते 15 पर्यंत उमेदवारी अर्ज स्विकारण्यात येणार आहे. दि.18 रोजी दाखल झालेल्या अर्जांची छाननी होणार आहे व दि.19 रोजी तहसिल कार्यालयामध्ये पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा 3 जून रोजी तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात होणार आहे.

दि.3 रोजी उत्तराची विवरणी प्रसिध्द केली जाणार आहे. दि.5 रोजी हरकत मागविणे, 7 ला हरकतींवर सुनावणी, 8 ला तोंडी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. दि.11 रोजी तोंडी परीक्षा व त्याच दिवशी पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करुन दि.18 रोजी नियुक्तीचे आदेश देण्यात येणार आहेत.यासाठी उमेदवार हा 18 वर्षांपेक्षा कमी व 40 वर्षे वयापेक्षा जास्त नसावा, शैक्षणिक पात्रता किमान 4 पास असावी, उमेदवारांना लेखी व तोंडी परिक्षेत गुणवत्ता प्राप्त करावी लागेल अशा काही अटी लागू असून अर्जासोबत शैक्षणिक व वयाचा पुरावा असलेला दाखला, जातीचा दाखला, वर्तणूक व आरोग्याचा दाखला आदि कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.