होमपेज › Pune › अवैध फ्लेक्सबाजीला ऊत

अवैध फ्लेक्सबाजीला ऊत

Published On: Aug 26 2018 1:29AM | Last Updated: Aug 26 2018 12:33AMभवानी पेठ : मोहिनी मोहिते

अवैध ‘फ्लेक्सबाजी’ला ऊत आला असून, शहराचे विद्रूपीकरण वाढत चालले आहे. कारवाईबाबत मात्र प्रशासन सुस्त आहे, अशी टीका सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे. अनधिकृत फ्लेक्स उभारणारे जागामालक आणि व्यावसायिक या दोघांवर फौजदारी करा, अशा स्वरूपाची ही मागणी यावेळी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सर्वच राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांच्या आशा- आकांक्षा जाग्या झाल्या असून, महिनो उलटून गेले तरी फ्लेक्सवच्या माध्यमातून त्या चौका-चौकात झळकत आहे. हा फ्लेक्स कधी वाहतूक नियंत्रण दिव्यावर असतो, तर कधी दुकानांच्या पाट्यांसमोर. काही चौकातील फ्लेक्स् तर, संबंधित माननीय अथवा कार्यकर्त्यांच्या कायमस्वरूपी मालकीच्या असल्याप्रमाणे झळकत आहेत. त्यातून पीएमपीचे बस थांबेही सुटलेले नाहीत. या थांब्यांवर भले वेळापत्रक नसेल; परंतु राजकीय कार्यकर्ते आणि त्यांच्या नेत्यांचे फ्लेक्सब मात्र दिमाखात झळकत असतात. नागरिकांच्या दैनंदिन समस्यांशी घेणे-देणे नसल्याच्या अविर्भावात मोक्यारच्या ठिकाणी फ्लेक्सं झळकत असतात.

नागरिकांच्या खिशातून जमा होणार्‍या पैशातून महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या तिजोरीत भर पडत असते. तरीही बस थांबा असो अथवा रस्त्याचे काम, संबंधित लोकप्रतिनिधीच्या विकास निधीतून होत असल्याचे फलक सर्रास झळकतात. जणू काही संबंधितांनी स्वखर्चातून ते काम केले आहे, असा आव आणला जातो. दुर्दैवाने याबाबत सर्वच राजकीय पक्षांत विवेक हरवला आहे का, अशी परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे. अगदी वरिष्ठ म्हटले जाणारेही लोकप्रतिनिधी त्याला अपवाद नाहीत. त्यांचाच कित्ता कार्यकर्ते आणि आता किशोरवयीन मुलेही गिरवत आहेत. सुदैवाने काही माननीय आणि आमदारांचे सन्माननीय अपवादही आहेत. त्यांचे अनुकरण जर राजकीय कार्यकर्त्यांनी केले तर, शहराचे होत असलेले विद्रूपीकरण रोखले जाऊ शकते.

पालिकेचे अधिकारी आणि फ्लेक्स व्यावसायिक, ठेकेदार यांच्यातील संबधामुळे हा उद्योग चालतो. प्रशासनाने व्यावसायिक, ठेकेदार यांना पोसण्याचे थांबवून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून  प्रशासनाकडे केली जाते. त्यानंतर महापालिका आयुक्तांकडून फौजदारी कारवाई करण्याचे आश्वासन दिले जातात. , मात्र प्रत्यक्षात फ्लेक्सवर झळकणार्‍या व्यक्ती वर गुन्हा दाखल न करता  ‘फ्लेक्सबाजी’ प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला जातो. आणि पुन्हा परिस्थिती जैसे थे..  

विद्रुपीकरण रोखण्यासाठी संबधितांवर कारवाई झाली पाहजे, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी यापूर्वी अनेकदा अनधिकृत फ्लेक्सबाजीबद्दल सुनावले होते; मात्र त्याकडे पदाधिकारी आणि अधिकारी यांनी दुर्लक्ष केले होते. परंतु, आता 2017च्या निवडणुका होऊन ही त्या अनुषंगाने आजही अनेक प्रतिस्पर्धी कार्यकर्ते अनधिकृत फ्लेक्स उभारून विद्यमान सदस्यांपुढे आव्हान निर्माण करू लागले आहेत. याबाबत अनधिकृत फ्लेक्सबाजी विषयी प्रशासनाकडे अनेकदा माहिती मागितली. परंतु, अधिकारी, ठेकेदार यांच्यातील अर्थपूर्ण संबधांमुळे पुरेशी माहिती दिली जात नाही,