Thu, Nov 15, 2018 11:39होमपेज › Pune › पक्षाचे काम करायचे नसेल तर राजीनामे द्या : अजित पवार

पक्षाचे काम करायचे नसेल तर राजीनामे द्या : अजित पवार

Published On: Jun 04 2018 1:30AM | Last Updated: Jun 04 2018 12:57AMबारामती : प्रतिनिधी

बारामती तालुक्यात विविध संस्थांवरच 300 पदाधिकारी आहेत. तरीही पक्षाने आयोजित केलेल्या आंदोलनासाठी यायला तुमच्याकडे वेळ नसेल, तुम्हाला काम करायचे नसेल तर राजीनामे द्या, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील पदाधिकार्‍यांची हजेरी घेतली. 

राष्ट्रवादीच्या बारामतीतील इंधन दरवाढीविरोधातील आंदोलनाला अनेकांना दांडी मारल्याने या आंदोलनाचा फज्जा उडाला होता. यासंबंधी वृत्तपत्रात बातम्या आल्याने संतप्त झालेल्या पवार यांनी रविवारी,‘पदाधिकार्‍यांनो टोकाचा निर्णय घ्यायला लावू नका’,  या भाषेत त्यांना सुनावले.  

मी आलो की तुमची गर्दी होते, खा. पवार आल्यावर तर जादा गर्दी करता. मग एरव्हीच ‘तुम लढो हम कपडे संभालते है,’ असे कशासाठी? असा सवाल पवार यांनी केला. पक्षामुळे तुम्हाला पद, मान-सन्मान मिळत आहे. त्याचा विसर पडू देऊ नका. असेही त्यांनी सुनावले.